एक्स्प्लोर
डिझेल टँकरचा भीषण अपघात, ड्रायव्हर केबिनमध्येच जळाला

जालना: जालना- औरंगाबाद महामार्गावर औद्योगिक वसाहतीजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला. एका डिझेल टँकरने विजेच्या खांबाला धडक दिलेल्या स्पार्किंग होऊन टँकरने पेट घेतली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत टँकर चालकाचा केबिनमध्येच जळून मृत्यू झाला. तर चालकासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. रामकीसन फड असं दुर्दैवी टँकर चालकाचं नाव आहे. हा टँकर पहाटे 2 च्या सुमारास मनमाडवरून नांदेडकडे जात होता. त्यावेळी डिझेल टँकरचा टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे भरलेला टँकर थेट वीजेच्या खांबावर जाऊन धडकला. त्यावेळी विद्युत तारांमुळे स्पार्किंग होऊन डिझेल भरलेल्या टँकरने पेट घेतला. काही क्षणांत आगीचा भडका उडून, आगीने केबिनमध्ये असलेल्या टँकरचालकाला भक्ष्य केलं.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















