(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रेबॉर्न मैदानही ताब्यात घ्या, संजय राऊतांचं ट्विट, तर चिखलामुळे मैदानाचा उपयोग होणार नाही,आदित्य ठाकरेंचं उत्तर
खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटला स्वत: कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, पावासाळ्यात खेळाचे मैदान वापरणे शक्य नाही.
मुंबई : मुंबईत वानखेडे सारखे मोठे मैदान क्वारंन्टाईनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना ब्रेबोन स्टेडियम ही वापरण्यात यावे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. पण पावसाळा तोंडावर असताना असे मैदान वापरणे योग्य ठरणार नाही असे आदित्य ठाकरे यांनीच ट्विट केल्याने वानखेडे आणि ब्रेबोन स्टेडियम येथील मैदान वापरले जाणारे नाही हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवल वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडियम इथे व्यवस्था करता येईल का याची पाहणी महापौर यांनी केली. परंतु वानखेडे भागातील स्थानिक नागरिकांनी क्वारंन्टाईन सेंटरला विरोध केला. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी वानखेडे प्रमाणे ब्रेबोन स्टेडियम ही वापरावे असे ट्विट केले.
All resources need to be utilized in Mumbai to fight against #Covid_19india.good call on taking up wankhede stadium to develop a quarantine facility..suggestion to @OfficeofUT - why not take over Brabourne stadium as well?It has much needed facilities @PawarSpeaks @AUThackeray
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 17, 2020
खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटला स्वत: कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, पावासाळ्यात खेळाचे मैदान वापरणे शक्य नाही. कारण पावसाच्या पाण्यामुळे तिथे चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाईनसाठी टणक (concrete) पृष्ठभूमी पाहिजे त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत. त्यामुळे वानखेडे ,ब्रेबोन येथील मैदान वापरणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. फक्त गरज पडल्यास या स्टेडियममधील पार्किंगआणि खोल्या वापरता येईल का याचा निरामय वेळेनुसार महापालिका घेईल.
वानखेडेच्या कोविड सेंटरला भाजप नेते राज पुरोहित यांचा विरोध
मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर कोविड सेंटर उभारण्याला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात पुरोहित यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिल आहे. वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये काही कंपन्यांची कार्यालये आहेत, शिवाय हा परिसर रहिवासीदेखील आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असं म्हणत राज पुरोहित यांनी वानखेडे स्टेडियमवर उभारल्या जाणाऱ्या कोविड सेंटरला विरोध केला आहे.
वानखेडे स्टेडियमला क्वारंटाईन सेंटर बनवणे चुकीचं ठरेल : डॉ. सुजय कांतावाला (वकील, मुंबई उच्च न्यायालय)
मुंबईत वाढत्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता, मिळेल ती मोकळी जागा, मंदिरं, शाळा ताब्यात घेऊन तिथे क्वारंटाईन सेंटर बनवण्याच नियोजन मुंबई महानगर पालिकेकडून केले जात आहे. त्यातच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला देखील ताब्यात घेऊन असिम्पटोमॅटिक रुग्णांवर उपचार केले जातील, अशी नोटीस मुंबई क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाचे वकील डॉ. सुजय कांतावाला यांनी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन सेंटर बनवण्यास विरोध दर्शविला आहे.
BMCकडून शहरातील कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना; एकूण 661 कंटेन्मेंट झोन, 1110 सीलबंद इमारती