दहावीचे तीन पेपर शिल्लक असतानाच विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू, बीडमधील घटना
दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या बीड शहरातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
बीड : दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या बीड शहरातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटूंबियाने आक्रोश केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सृष्टी रोहिदास काळे (वय 16 वर्ष) असं मृत विद्यार्थीनीचं नाव असून ती बीडच्या छत्रपती कॉलनी येथे वास्तव्यास आहे. ती सध्या दहावीची परीक्षा देत होती. तिचे आणखी तीन पेपर शिल्लक होते, पण असे असतानाच सोमवारी रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवत उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून ते पुढील तपास करत आहेत. दरम्यान, ही आत्महत्या की घातपात याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस मोबाईलच्या मदतीने करत आहेत तपास
सृष्टीने यंदा दहावीचे सगळे पेपर दिले असून विशेष म्हणजे ती मामाकडे राहत होती. आणखी तीन विषयाचे पेपर शिल्लक असतानाच तिने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. नेमके कोणत्या कारणामुळे तिने आयुष्य संपवलं हे समजू शकलेले नाही. दरम्यान पोलिसांनी सृष्टीचा मोबाइल देखील जप्त केला आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे सृष्टीने आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. सृष्टीची हत्या आहे की आत्महत्या याचा तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. परीक्षा सुरू असतानाच तिने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा-
- Exam 2022 : पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' महिन्यात होणार; परीक्षा परिषदेने घेतला महत्त्वाचा निर्णय
- मराठी माध्यमांच्या पहिलीच्या अभ्यासक्रमात यंदापासून मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांच्या 'या' मोठ्या घोषणा
- UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी खाण्यासाठी विकत घेतली जाते पण खाल्ली जात नाही? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha