एक्स्प्लोर

Maharashtra Legislature : विधिमंडळाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात साडेतीनशे आमदारांचे निलंबन; जांबूवंतराव धोटे निलंबित होणारे पहिले आमदार

गैरवर्तणूक, राजदंड पळविणे, कागदपत्र फाडणे, मुख्यमंत्र्यांना इजा करण्याचा प्रयत्न, सभागृहात प्रेतयात्रा काढणे, केरोसिन अंगावर घेणे, आदी प्रकरणांत आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Maharashtra Assembly Winter Session : विधिमंडळाच्या अधिवेशनात आतापर्यंत साडेतीनशे सदस्यांचे (MLA) निलंबन करण्यात आले आहे. निलंबित झालेले पहिले सदस्य विदर्भवीर जांबूवंतराव धोटे होते. गोंधळ, गैरवर्तणूक, राजदंड पळवणे, कागदपत्र फाडणे, मुख्यमंत्र्यांना इजा करण्याचा प्रयत्न करणे, सभागृहात प्रेतयात्रा काढणे, विषारी औषधी आणि केरोसिन (रॉकेल) अंगावर घेणे, आदी प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली होती.

विधिमंडळातील प्राप्त नोंदीनुसार सर्वप्रथम 12 ऑगस्ट, 1964 ला जांबूवंतराव धोटे यांच्यावर निलंबनाची कारवाई (Action of suspension on MLA)  करण्यात आली होती. धोटे यांनी माईक बंद असल्याच्या कारणावरुन माईक तोडला होता. पेपर वेट फेकून मारला होता. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्यात आले होते. 2021 मध्ये पिठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने भाजपच्या 92 सदस्यांचे निलंबन झाले होते, तर यंदा ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अध्यक्षांविषयी अपशब्द बोलल्याने करण्यात निलंबन आले. 

'या' प्रश्नावरुन सर्वाधिक सदस्यांचे निलंबन

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावादाच्या प्रश्नावरुन सर्वाधिक सदस्यांवर निलंबनाची कारवाई झाली. ऑगस्ट, 1966च्या अधिवेशनात 20 सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरच्या वर्षात एकाच अधिवेशनात दोन वेळा 43-43 सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दुष्काळ आणि टंचाईच्या मुद्यावरुनही निलंबन

22 मार्च, 1973 ला दुष्काळ व टंचाईच्या मुद्यावरुन झालेल्या गोंधळामुळे तब्बत 27 सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. 1974 मध्ये याच कारणावरुन झालेल्या गोंधळातून 17 आमदार आणि 1975 मध्येही 1 आमदार निलंबित झाले होते, तर 1985 ला शासनाने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी योजना बंद केल्याने 12 आमदारांचे निलंबन झाले होते.

आमदारांनी काढली होती प्रेतयात्रा

2009 साली शपथविधी कार्यक्रमात अनुचित वर्तन केल्याप्रकरणी मनसेचे नऊ आमदार निलंबित झाले होते. तर रमाई आंबेडकरनगरातील गोळीबारप्रकरणी सभागृहात प्रेतयात्रा काढल्यामुळे समाजवादी व भाकपचे पाच सदस्य निलंबित झाले होते.

मुख्यमंत्र्यांना शारीरिक इजा केल्याप्रकरणी निलंबन

1991च्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना शारीरिक इजा केल्याप्रकरणी सेनेच्या 3 आमदारांना निलंबित केले होते, तर 1987च्या अधिवेशनात अध्यक्षांची परवानगी न घेता, फलक झळकवून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी छगन भुजबळ यांना निलंबित केले होते. अध्यक्षांच्या टेबलावर हात आपटून कामकाजात अडथळा आणल्याने 1993 मध्ये 6 आमदार निलंबित केले होते. राजदंड पळवून नेल्याने सभागृहात अंगावर केरोसिन ओतण्याचा प्रयत्न केल्याने 2005 मध्ये गुलाबराव गावंडे यांना निलंबित केले होते. याच वर्षात अध्यक्षाच्या दालनात उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याने 3 सदस्यांचे निलंबन झाले होते. 2006 मध्ये अध्यक्षांना पुस्तिका फेकून मारल्यामुळे 6 आमदारांचे निलंबन झाले होते. 2010 मध्ये राजदंड पळवल्याने संजय राठोड यांचे निलंबन झाले होते. राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने 5 आमदारांचे निलंबन 2014 मध्ये झाले होते.

ही बातमी देखील वाचा...

नागपूर जिल्ह्यात फक्त तीन विधानसभा मतदारसंघांना निधी; सत्ताधारी पक्षाला झुकते माप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget