संकेत बावनकुळेंचे मेडिकल का केलं नाही? ऑडी हिट अँड रन प्रकरणात सुषमा अंधारेंच्या आरोपांचा फैरी; नागपूर पोलीस म्हणतात....
Nagpur audi Accident: नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघात प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न विचारले आहेत.
Nagpur Accident नागपूर: नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघात (Nagpur audi hit and run Accident) प्रकरणावरून आता राज्याचे राजकारण तापत असल्याचं चित्र आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी या घटनेच्या संदर्भात पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. सोबतच त्यांनी पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तर त्यावर बोलताना नागपूर पोलिसांनी सांगितले आहे की, आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही आणि आम्ही त्याला बळी पडण्याचे ही कुठले कारण नाही. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, आम्ही त्या पद्धतीने समोर जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लाहोरी बारमध्ये मसाला दुध पिला असला तरी
अपघातावेळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत गाडीत असताना त्यांचे मेडिकल का केलं नाही? लाहोरी बारमध्ये मसाला दुध पिला असला तरी त्याने गाडी दारू पिणाऱ्याला का दिली? रविवारी रात्री 12.30 च्या सुमारस रोनित, अर्जुन आणि संकेत यासह अजून एक जण होता. तर पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे या प्रकरणात नेमकी माहिती का लपवत आहे? गाडीचे रजिस्ट्रेशन होऊन केवळ 28 दिवस झाले होते. तरीही गाडीचा पंचनामा का केला नाही? असे एक ना अनेक प्रश्न यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहे.
फडणवीस यांना खरंच निरपेक्ष चौकशी करायची असेल तर....
अपघातातील गाडी 150 किमीच्या वेगाने होती. त्यामुळं ती बंद पडली आणि नंतर गॅरेज मध्ये नेली. तर दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते यांना व्यक्त व्हायला 36 तास का लागले? फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांच्यावर दबावात आहे. त्यांना पोलीस संरक्षण द्यायला हवे, त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला आहे. फडणवीस यांना खरंच निरपेक्ष चौकशी करायची असेल तर संकेत बावनकुळे यांचे नाव आरोपी म्हणुन घ्या. संकेत गाडी चालवत नव्हता, तर सलमान खान केसमध्ये गाडी चालवणारा व्यक्ती दोषी कसा? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहे.
पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?
दुसरीकडे या प्रकरणावर नागपूर पोलिसांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही आणि आम्ही त्याला बळी पडण्याचेही कुठले कारण नाही. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, आम्ही त्या पद्धतीने समोर जात आहोत. ऑडी कार अर्जुन चालवत होता, त्याच्या शेजारी संकेत बसला होता, तर पाठीमागच्या सीटवर रोनित बसला होता. ऑडी कारचे आरटीओकडून इन्स्पेक्शन झाले आहे. मेडिकल अहवाल ही आम्हाला मिळाला आहे. जो काही तपास सुरू आहे, तो नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे कोणालाही वाचवण्याचे कारण नसल्याचे नागपूर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा