एक्स्प्लोर

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : सुरेश जैन

जळगाव : तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावात एका कार्यक्रमात बोलताना सुरेश जैन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. गेल्या काही दिवसांपासून ते निवडणूक लढवणार का, याबाबत चर्चा रंगली होती. जळगावमधील घरकूल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना तुरुंगवास भोगावा लागला. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. कोण आहेत सुरेश जैन? सुरेश जैन यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये सुरेश जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधलं. मात्र राष्ट्रवादीनंतर सुरेश जैन यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या राजकीय कारकीर्दीत सुरेश जैन यांनी अनेक मंत्रिपद भूषवली आहेत. सध्या भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले एकनाथ खडसे यांचे राजकीय वैरी अशीही सुरेश जैन यांची ओळख आहे. जळगाव नगरपालिकेच्या घरकूल प्रकरणात 29 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सुरेश जैन यांना दि. 10 मार्च 2012 ला मध्यरात्री पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा पासून जैन हे कारागृहातच होते. जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने किमान 10 वेळा जैन यांचा जामीन फेटाळला होता. मध्यंतरी आजारपणामुळे केवळ 2 दिवसांचा तात्पुरता जामीन जैन यांना देण्यात आला होता. इतर काळ ते कारागृहातच होते. जैन हे प्रभावशाली नेते असून ते साक्षीदार व इतर आरोपांवर प्रभाव टाकू शकतात असा युक्तिवाद करीत सरकार पक्षाने जैन यांना जामीन मिळून दिला नव्हता. मात्र, या प्रकरणातील सर्व साक्षीदार व संशयित आरोपींचे जबाब झाले असून आता  जैन कोणावरही प्रभाव टाकू शकत नाही, हा युक्तीवाद ग्राह्य मानून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2 सप्टेंबर 2016 रोजी जामीन मंजूर केला. काय आहे जळगाव घरकुल घोटाळा? जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पोलिसात तक्रार मनपाचे आयुक्त प्रविण गेडाम यांनी दिली होती. त्यांनी त्यात मुद्दा मांडला होता की, जळगाव घरकुल योजनेचे बांधकाम वेळेत न करणाऱ्या खानदेश बिल्डरने दुसरी कंपनी ईसीटी हौसिंग कंपनीला दोनदा मुदत वाढ दिली होती. तत्कालीन जळगाव नगर पालिकेने घरकुल योजनेचे काम खानदेश बिल्डरला दिले होते. त्यासाठी नऊ महिन्यांची मुदत दिली होती. त्यानुसार बांधकाम २००१ ते २००२ मध्ये पूर्ण व्हायला हवे होते. मात्र पहिली मुदत वाढ २००४ पर्यंत आणि नंतर २००६ पर्यंत देण्यात आली. त्यानंतरही खान्देश बिल्डरने घरकुल योजनेचे काम ईसीटी हौसिंग कंपनीलाच दिले. त्यापोटी ईसीटी कंपनीला उचल रक्कम देण्यात आली आणि ती नंतर सुरेश जैन यांच्या खात्यात वळती झाली. म्हणजेच खान्देश बिल्डरचं ईसीटी नावाने या घरकूल योजनेचे काम करीत होते. गेडाम यांच्या तक्रारीनंतर जळगावचे पोलीस उपअधिक्षक ईशू संधू यांनी तपास करून जैन आणि इतर ५२ जणांवर दोषारोप पत्र ठेवले होते. दोषारोपपत्रात म्हटले आहे की, घरकुल योजनेचे काम घेणाऱ्या खान्देश बिल्डर्सला ११ कोटी ५६ लाखांची मोबेलायजेशन रक्कम अदा झाली. मात्र, खान्देश बिल्डर्सकडून घरकुलांच्या कामासाठी यंत्रसामग्री न घेता ती रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आली. खान्देश बिल्डरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले जैन यांच्या जेएम कॉटन कंपनीकडे सहा कोटी ९० लाखांचा निधी वळता झाला होता. जळगाव पालिकेने ३ मे १९९९ ला ११ कोटी ८३ लाखांच्या मोबेलायजेशन फंडातून कराची रक्कम वजा करून ११ कोटी ५६ लाखांचा निधी खान्देश बिल्डर्सच्या खात्यात वर्ग केला होता. नंतर आठ धनादेशांद्वारे ही रक्कम खानदेश बिल्डर्सकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यावर वर्ग झाली. यासंबंधी बॅंकेच्या लेखापत्रकावरून खान्देश बिल्डर्सने केवळ तीन लाखांचा निधी यंत्रसामग्रीसाठी खर्च केला होता, असे दिसून आले. त्यात मोबाइल, संगणक आदींसाठी अधिक रक्कम खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले. यात पुढील दोन वर्षे ही रक्कम यंत्रसाम्रग्रीसाठी वापरण्यात आली नव्हती. निधी “जेएम कॉटनकडे खान्देश बिल्डर्सने अशी अग्रीम रक्कम ही मुदत ठेवीसाठी वापरात आणून तीन वेगवेगळ्या कंपन्यांना पाठविली. त्या कंपन्यांचे जैन, राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी संचालक होते. बॅंक पासबुकातील नोंदींवरून खानदेश बिल्डर्सने संबंधित कंपन्यांमध्ये ही रक्कम वर्ग केली. त्यात कृषिधन कंपनीने एक कोटी पाच लाख आणि शेठ भिकनचंद जैन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ६० लाख रुपये जेएम कॉटनमध्ये वर्ग केले होते. त्यामुळे दोन दिवसांत जेएम कॉटन कंपनीत सहा कोटी रुपये वर्ग झाले होते. “वाघूरचा ठेका जळगाव पालिकेने “वाघूर‘चा ठेका तापी प्री स्टेट कंपनीला दिला होता. त्यात ३ मे १९९९ ला या कंपनीला दहा कोटी ७५ लाखांचा ऍडव्हान्स दिला गेला होता. मात्र, काही अडचणींमुळे धनादेश वटला नाही. त्यामुळे ४ मे १९९९ ला लगेच नऊ कोटींचा धनादेश दिला गेला. त्यापैकी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेले जैन यांच्या जेएम कॉटन कंपनीच्या खात्यात अडीच कोटी, नंतर एक कोटी २४ लाखांचा निधी वळता झाला होता. संबंधित बातम्या :

घरकुल घोटाळा : ४ वर्षे ५ महिने ३ दिवसांनी सुरेश जैन तुरुंगाबाहेर येणार

जळगाव घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Embed widget