एक्स्प्लोर
उस्मानाबादेत नातेवाईकाकडून 6 वर्षीय मुलाचा नरबळी
उस्मानाबाद : सुमारे अडीच महिन्यांपूर्वी 6 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाली होती. या हत्येचं खळबजनक कारण समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या अघोरी कारस्थानाला बळी पडून मुलाची हत्या झाल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.
कळंब तालुक्यातील डोळा पिंपळगाव या गावात 26 जानेवारीला 6 वर्षे वयाच्या कृष्णा इंगोले या मुलाची हत्या झाली. 26 जानेवारी रोजी शाळेतील कार्यक्रमासाठी कृष्णा गेला होता, घरी परतलाच नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची शोधा-शोध केली. दुसऱ्या दिवशी घरच्या बाजूलाच असलेल्या शेतात कृष्णाचा मृतदेह आढळून आला होता.
जानेवारीच्या 26 तारखेला अमावस्या होती आणि कृष्णाची हत्या ज्या पद्धतीने झाली होती, ते पाहता ही हत्या अंधश्रद्धेच्या प्रकारातून झाल्याचे पोलिसांना प्राथमिक संशय होता.
पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता, गुन्ह्यातील आरोपी हे या मयत कृष्णा इंगोले या मुलाचे नातेवाईक असल्याचे समोर आले. पुण्यातील लखन उर्फ राहुल चुडावकर या तांत्रिक बाबाच्या मदतीने कृष्णाचा नरबळी देऊन, हत्या केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
या प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांनी पुण्याच्या तंत्रिकासह एकूण 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement