(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Tatkare: सुनील तटकरेंचे अजित पवारांसमोर 5 गौप्यस्फोट, कर्जतच्या शिबिरात स्फोटक भाषण
सुनील तटकरेंनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही?, पहाटेचा शपथविधी, मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) पक्षाची भूमिका अशा अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे.
रायगड : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून (Ajit Pawar) दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिबिराला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) गौप्यस्फोट केले आहे. सुनील तटकरेंनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही?, पहाटेचा शपथविधी, मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) पक्षाची भूमिका अशा अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याआधी सगळ्यांना विचारणा केली होती. यासोबतच भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांनी सह्या केल्या होत्या असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले आहे.
अजित पवारांची पक्षाने बाजू घेतली नाही
2004 साली मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं नाही याचं स्पष्टीकरण अजित दादा तुम्ही आता द्यायला हवं. अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांनी आघाडी सरकार चांगलं चालवलं . परंतु पृथ्वीराज चव्हाण 2010 साली मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बदल झाला. अजित पवार यांच्यावर 2009 नंतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये टीका सुरू झाली. त्यावेळी पक्षाने तुमची बाजू घ्यायला हवी होती. परंतु पक्षाने ती घेतली नाही वाईट मला वाटलं . पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकवेळा निरोप दिले. ती भेट झाली असती तर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुमिका घेतली असती तर तुमचा राजीनामा घ्यावा लागला
अजित पवार यांचा पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोठा हात
अजित पवार यांनी पक्ष स्थापन केल्यापासून फक्त पदे भोगली. दादा आणि संघटनेचा दुरान्वये संबंध नाही असे म्हणताआता तूम्ही सांगा तुम्हांला हे पटत आहे का? अजित पवार यांनी भुजबळ यांचा राजीनामा झाला त्यानंतर बबनराव पाचपुते यांना प्रदेशाध्यक्ष केलं. मी ज्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी मला अध्यक्ष करावं असं सांगितलं. निवडणूक आयोगासमोर सांगितलं अजित पवार यांनी काहीचं केलं नाही. मला त्यांना सांगायचं आहे की अजित पवार यांचा पक्षाचा जडणघडणीमध्ये मोठा हात आहे.
पहाटे शपथविधी का झाला?
वेगवेगळया कार्यक्रमात सांगितलं जात 2019 सालची निवडणूक युतीला बहुमत देणारी होती. कौल अर्धा भाजप आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात जनतेने दिला होता. सोनिया गांधी यांनी उध्दव ठाकरे यांच्या सरकाराला पाठींबा दिला हे अघटीत होतं. पहाटे शपथविधी झाला तो का झाला हे अजित पवार यांनी सांगितलं आहे.
2017 साली राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन झालं
महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. जे सोबत नाहीत आत्ता ते देखील अजित पवार यांच्यासोबत होते. त्यावेळी एक पत्र तयार करण्यात आलं. त्यामधे ठाणे, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्याने देखील सही केली होती. कोणीतरी दावा करते की, मी अलिबागला एक बैठक घेतली होती. मी त्यांना सांगतो अलिबागमध्ये जी बैठक झाली ती शरद पवार यांनी मला घ्यायला लावली होती. 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन झालं असतं. त्यावेळी याच हॉटेलमध्ये बैठक झाली होती. आज देखील त्याच हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. काय योगायोग असतात. त्यावेळी मी अध्यक्ष होतो आजही अध्यक्ष होतो. आपण सत्तेत सहभागी झालो एक महिना आपण थांबलो अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मला सांगितलं मंत्र्यांना घेऊन जा आणि शरद पवार यांची भेट घ्या मी देखील जाऊन घेतली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पक्षाची भुमिका
आयोगाची सुनावणी लांबली जातेय की लांबवली जातेय हे कळत आहे. आता 53 पैकी 43 आमदार आपल्या सोबत आहेत. मतदारसंघात जरा विचार न करता सर्व आमदार उभे राहिले हे महत्त्वाचे आहे. काही सत्तेत सहभागी आहेत आणि विरोधात देखील आहोत. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं हीच आपल्या पक्षाची भुमिका आहे
आजित पवार ढोंग करणारा नेता नाही : तटकरे
आजित पवार यांना राजकिय डेंग्यू झाला असे आरोप झाले अजित पवार ढोंग करणारा नेता नाही. आपण बीड कोल्हापूर, बारामतीला गेलो आपलं जोरदार स्वागत झालं कारण विश्वासाहर्ता एका दिवसांत तयार होतं नसते
सुप्रिया सुळेंवर टीका
सुनील तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. तटकरे म्हणाले, निवडणूक आयोगातील निकाल आपल्या बाजूने लागेल असं आपण बोललो की काहीजण टीका करत असतात. त्यांना सांगायचं आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आपला निर्णय आहे. उदया निवडणूक आयोगाचा निर्णय लागेल त्यावेळी पेपर फुटला असे म्हटलं जाईल परंतु तुम्हा कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की, हा निर्णय अदृश्य हाताने दिलेला निर्णय नाही. तर कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय असणार आहे.