(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Agitation : ऊस दराचा प्रश्न पेटला, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडलं
ऊस दराच्या (Sugarcane Price) मुद्यावरुन यंदा देखील वातावरण तापलं आहे. पंढरपुरात (Pandharpur) ऊस दराच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.
Pandharpur Agitation : ऊस दराच्या (Sugarcane Price) मुद्यावरुन यंदा देखील वातावरण तापलं आहे. पंढरपुरात (Pandharpur) ऊस दराच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. रात्री उशीरा पुणे-पंढरपूर रस्त्यावरील (Pune-Pandharpur road) वाखरी इथं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आलं आहे. हे ऊसाचे ट्रॅक्टर श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना अज्ञात लोकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंढपुरात ऊस दर संघर्ष समितीनं मेळावा घेतला होता. यामध्ये ऊसाला 3 हजार 100 रुपयांचा भाव मिळावा. तसेच पहिली उचल 2 हजार 500 रुपयांची मिळावी या अशी मागणी करण्यात आली होती. तोपर्यंत कोणीही ऊस वाहतूक करु नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ठिक-ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून गांधींगिरी पद्धतीनं गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र, काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गाडीवरुन आलेल्या तीन ते चार अज्ञातांनी ट्रॅक्टरचे टायर फोडल्याचं कृत्य केलं आहे.
ऊस दरासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्र
सोलापूर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी सर्वच साखर कारखानदार एकत्र येतात आणि ऊसदर ठरवतात. ऊस दराच्या या प्रश्नांवर कारखान्यांचे अध्यक्ष आपला राजकीय पक्ष, गट, संघटना विसरतात, मग शेतकरी या प्रश्नांवर एकत्र का येऊ शकत नाहीत, अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी व्यक्त केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित संघटना, जनशक्तीसह विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या असून, ऊसदर संघर्ष समितीची स्थापना केली आहे.
ऊसाला 3 हजार 100 चा दर देण्याची मागणी
23 ऑक्टोबरला पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने ऊस परिषद घेण्यात आली होती. यावेळी हजारो संख्येनं शेतकरी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने सुरु झाले असले, तरी अद्यापही कोणत्याही साखर कारखाण्यानं आपला दर जाहीर केला नाही. तसेच, शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन ऊसाला 3 हजार 100 चा दर तर, पहिली उचल 2 हजार 500 रुपये देण्याचा ठराव ऊस परिषदेनं केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कारखान्यानं दराबाबत जाहीर भूमिका न घेतल्यानं या सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: