मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी, नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप
सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय.
नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे. मविआचं सरकार आल्यानं पेग, पेंग्विन आणि पार्टीला सुरुवात झाली, असे आशिष शेलार म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी 93 च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगतोय. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत.1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील यारोपी सलिम कुत्ता हा पेरोलवर असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा
नितेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सलीम कुत्ता बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी आहे. दाऊदच्या जवळचा सहकारी आहे . पेरोलवरती असताना पार्टी करायची . कुत्ता याच्यासोबत कुणाचा संबंध आहे. त्यात आणखी कोणाचा संबंध आहे का याची चौकशी केली जाणार आहे. एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाणार आहे.
सभागृहात कोण काय म्हणाले?
दादा भुसे:
दादा भुसे म्हणाले, बडगुजर हा छोटा मासा आहे . देशाचा नंबर एक शत्रु दाऊद आहे. त्याला रसद पुरवणारा कोण आहे? बडगुजर याचा तपास केला पाहिजे. पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे.
आशिष शेलार :
अशिष शेलार म्हणाले, मविआ सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टीची सुरुवात झाली गंभीर बाब आहे. राजकिय वरदहस्त असल्याची बाब आहे. कुत्याला बिल्लीच समर्थन आहे. अजय चौधरी तुम्ही यावर कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी केली पाहिजे.
हे ही वाचा :
तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊद्या, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज