एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर होणार? शिक्षण मंत्री अभ्यास गटाची स्थापना करणार
उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका अभ्यास गटाची स्थापना करणार असल्याचे सांगितले आहे.
उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज संगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.
सामंत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भौगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. गठीत केलेल्या समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत. या सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनांकडे सादर करावा,अशा सूचनाही सामंत यांनी केल्या आहेत. या बैठकीस उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी माजी कुलगुरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखालील समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ करावे, अशी मागणी आनेक दिवसापासून होत होती. उस्मानाबाद मध्ये विद्यापीठासाठी पुरेशा सुविधा आहेत. शिवाय केंद्र सरकारचे प्रत्येक जिल्ह्यासाठी विद्यापीठ हे धोरण आहे.
गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून तरुणीचा ऑनलाईन अभ्यास; सिधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड
आज सामंत यांनी या विषयावर सबंधित विभागाच्या प्रमुखासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, विभागीय सहसंचालक यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते, ही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन घेण्यात आली. बैठकीमध्ये विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आवश्यक बाबीवर सविस्तर चर्चा झाली. गठित समितीने त्या भागातील सर्व घटकाची मते जाणून घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तीन महिन्यात द्यायचा आहे. या समितीने पालक, विद्यार्थी सबंधित सर्वच घटक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याची तीव्रता लक्षात येणार असल्याचे बाब यावेळी मांडण्यात आली आहे.
या समितीमध्ये माजी कुलगुरु आर.एन. माळी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्या डॉ. अनार साळुखे, शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उस्मानाबादच्या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे.
Ratnagiri |डोंगरावर झोपडी बांधून कोकणची कन्या करतेय ऑनलाइन पशुवैद्यकीय पदवीचा अभ्यास! स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement