एक्स्प्लोर
वर्ध्यात भरधाव कंटेनरनं उडवल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या आर्वीत तळेगाव मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने विद्यार्थ्याला धडक दिली. या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अवथळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. वर्ध्याच्या आर्वी गावात राहणारा अभिषेक अकराव्या वर्गात शिकत होता. शिकवणी वर्गाला जात असतांना त्याला भरधाव कंटेनरनं उडवलं. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. कंटेनर चालकाच्या अटकेची मागणी करत अभिषेकचे मित्र आणि कुटुंबियांनी पोलीस स्टेशन समोर धरणं धरलं होतं. तहसीलदार आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















