(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: नागपुरात वंदे भारतसह अनेक रेल्वे गाड्यांवर दगडफेक; 18 जणांवर कारवाई
Nagpur : वंदे भारत एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 वेळा दगडफेक झाली. या घटनेत काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जखमी सुद्धा झालेत.
Nagpur Railway News : अत्याधुनिक आणि स्वदेशी वंदे भारत एक्स्प्रेससह (Vande Bharat Express) इतरही रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली जात आहे. अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. समाज कंटकांकडून असा खोडसळपणा केला जात आहे. मात्र, त्यांच्या आनंदात दुसऱ्यांचा जीव धोक्यात येतो. शिवाय रेल्वेच्या संपत्तीचेही नुकसान होत आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेने कंबर कसली असून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या गाड्यांवर दगडफेकीच्या घटना
नागपुरातून सुटणाऱ्या कोलकाता मार्गाने जाणाऱ्या गाड्यांवर रूळाशेजारी असलेली मुले गाड्यांवर दगडफेक करतात. यात वंदे भारत एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 वेळा दगडफेक झाली. या घटनेत काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जखमी सुद्धा झालेत.
संशयितांची धरपकड
याची गंभीर दखल घेत रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त पंकज चूघ यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेचे पथक तयार करण्यात आले असून दगड फेकणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. नागपुरातून गाडी सुटल्यानंतर आउटवर, कळमना, कामठी तसेच गोंदिया पर्यंतच्या मार्गावर दगडफेक केली जाते. दगडफेक होणाऱ्या ठिकाण चिन्हांकित केले असून आरपीएफचे पथक त्या ठिकाणी जाऊन दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करून कायदेशीर कारवाई केली जात आहे.
आतापर्यंत 18 जणांवर कारवाई
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे दगडफेक कुठे आणि कोणी केली याचा तपास करून 18 जणांवर कारवाई केली आहे. तसेच या सर्वांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. दगडफेक करणाऱ्यांची माहिती त्वरित आरपीएफला (RPF) द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दगडफेक करणे, रेल्वे संपत्तीचे नुकसान करणे या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास पाच वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
नागपूर ते पुणे जाणारी ही गाडी पुढील दोन दिवस रद्द
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेतर्फे नागपूरमार्गे चालवण्यात येणारी कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. यासह अनेक गाड्यांच्या मार्गांतही बदल झाले आहे. गाडी क्रमांक 11039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर)- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 26 आणि 27 जानेवारीला रद्द केली आहे. यासह 11040 गोंदिया- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 आणि 29 जानेवारीला धावणार नाही.
ही बातमी देखील वाचा...