एक्स्प्लोर

मेक इन महाराष्ट्रचा बट्ट्याबोळ, रोजगार घटले!

सरकार रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे.

मुंबई : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ सारखे कार्यक्रम करुन गाजावाजा करणारं राज्य सरकार रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारचे दावे किती खरे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नोव्हेंबर 2016 पर्यंत राज्यात निरनिराळ्या उद्योग प्रकल्पात  11 कोटी 37 लाख 783 कोटींची गुंतवणूक होईल असं म्हंटल जात होतं, पण फक्त 2 कोटी 69 लाख 814 कोटींची गुतंवणूक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही गुंतवणूक कमी झाली, शिवाय रोजगार निर्मिती झालेली नाही. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत. त्या मुंबईतही रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीत घट झालेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी केलेल्या अर्जाला हे उत्तर देण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती जिल्ह्यातील कार्यरत इंडस्ट्री, फॅक्टरी
  • वर्ष 2013-14 मध्ये 1332
  • वर्ष 2014-15 मध्ये 1267
  • वर्ष 2015- 16 मध्ये 12
नागपूर जिल्ह्यातील रोजगार निर्मिती
  • वर्ष 2013-14 मध्ये 8750
  • वर्ष 2014-15 मध्ये 10,847
  • वर्ष 2015-16 मध्ये 1151
एकूण गुंतवणूक (लाखांमध्ये)
  • वर्ष 2013-14 मध्ये 21196
  • वर्ष 2014-15 मध्ये 14168
  • वर्ष 2015-16 मध्ये 294
nagpur अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती रोजगार निर्मिती
  • वर्ष 2014 मध्ये 1156
  • वर्ष 2015 मध्ये 3053
  • वर्ष 2016 मध्ये 2513
चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूक (लाखांमध्ये)
  • वर्ष 2014 मध्ये 3092
  • वर्ष 2015 मध्ये 4019
  • वर्ष 2016 मध्ये 2441
chandrapur ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती रोजगार निर्मिती
  • वर्ष 2014-15 मध्ये 65,071
  • वर्ष 2015 (ऑक्टोबर 2015 पर्यंत) मध्ये 36,541
ठाणे जिल्ह्यातील गुंतवणूक (लाखांमध्ये)
  • वर्ष 2014-15 1,33,034
  • वर्ष 2015- (ऑक्टोबर 2015 पर्यंत) 1,02,323
thane मुंबई जिल्ह्यातील परिस्थिती कारखाने किंवा उद्योगांची नोंदणी
  • वर्ष 2014-15 मध्ये 3685
  • वर्ष 2015-16 मध्ये 1991
रोजगार निर्मिती
  • वर्ष 2014-15 मध्ये 81,311
  • वर्ष 2015-16 मध्ये  27,940
गुंतवणूक (लाखांमध्ये)
  • वर्ष 2014-15 मध्ये 138385
  • वर्ष 2015-16 मध्ये 121200
mumbai मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात रोजगार निर्मिती आणि गुंणवणुकीत मोठी घट झाल्याचं दिसून येत. तर मुंबई, ठाणे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. ज्या मेक इन इंडिया योजनेचा भव्य कार्यक्रम मुंबईत झाला तिथेच सरकार गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरलं. तरी उद्योगमंत्र्यांनी मात्र मुंबई हे औद्योगिक शहर नाही आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंणवणूक आल्याचा दावा पुन्हा एकदा केला. सरकारची निव्वळ घोषणाबाजी? मेक इन इंडिया सारख्या कार्यमक्रमात मुख्यमंत्र्यांनी आठ लाख करार केल्याचं जाहीर केलं होतं. पण मिळालेल्या माहितीनुसार, खरं चित्र वेगळंच आहे. सरकार फक्त घोषणा करतं आणि त्याची प्रसिद्धी करतं. प्रत्यक्षात काही होत नाही, हे यातून स्पष्ट होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असताना उद्योगासारख्या क्षेत्रात राज्याची झालेली पिछेहाट स्पष्ट होत आहे. ही माहिती नोटाबंदीच्या आधीच्या काळातील आहे. नोटाबंदीनंतर परिस्थिती अजून किती बिकट झाली असेल याचं चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. पण सरकारने केलेल्या मोठ्यामोठ्या घोषणांचं नेमकं काय होतंय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. संबंधित बातम्या राज्याची आर्थिक स्थिती बिकट, कर्जाची सर्वोच्च मर्यादा गाठली  राज्यातील विकासकामांच्या बजेटला ३० टक्क्यांची कात्री : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची आकडेवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Embed widget