एक्स्प्लोर
भ्रष्टाचार निर्मूलनाचं नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची बरखास्ती
भ्रष्टाचार निर्मूलन हे राज्य सरकारचे कामच असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केलं.

उस्मानाबाद : भ्रष्टाचार निर्मूलनाचं नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची बरखास्ती करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन हे राज्य सरकारचे कामच असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केलं. 'भ्रष्टाचार निर्मूलन' असं नाव कोणतीही संस्था धारण करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलेलं असल्यामुळे 'भ्रष्टाचार निर्मूलन' हे नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. जर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्देश मान्य नाही केले, तर संस्था बरखास्त करणार असल्याचंही धर्मादाय आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. मानवाधिकार हे नाव धारण करणाऱ्या संस्थाही बरखास्त होणार आहेत. राज्यभरामध्ये या दोनही नावाने रजिस्टर झालेल्या शेकडो संस्था बंद होतील. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन या नोंदणीकृत संस्थेचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी वाचा























