एक्स्प्लोर

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 41 तालुक्यात 82 वसतिगृह; राज्य सरकारचा निर्णय

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस काल (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

मुंबई : विंचवाच बिऱ्हाड पाठीवर या उक्तीप्रमाणे राज्यातील ऊसतोड कामगारांच जीवन नेहमीच पाहायला मिळतं. ऊसतोड हंगाम सुरु झाला की, ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नेहमीच स्थलांतरित होतात. जोपर्यंत ऊस तोडणीचा हंगाम संपत नाही. तोपर्यंत हे सर्व कामगार आपल्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी आपल्या पशुधनासह स्थलांतरित होतात. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत. अनेक असे ऊसतोड कामगार आहेत की त्यांनी साधी शाळेची पायरीही चढली नसेल. त्यांच्या दुसऱ्या पिढीची ही तीच अवस्था पाहायला मिळते. ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काल (बुधवारी) मंत्रीमंडळ बैठकीत वसतिगृहाची घोषणा करण्यात आली. 41 तालुक्यात जवळपास 82 वसतिगृह सुरु करण्याची घोषणा आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत करण्यात आली. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय मनाला जात आहे. 

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस काल (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. राज्यातील ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले 41 तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात 100 विद्यार्थी क्षमता असलेले मुला-मुलींसाठी मिळून दोन वसतिगृहे असे एकूण 82 वसतिगृहे उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येनार आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी, केज, पाटोदा, गेवराई, माजलगाव, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड या दहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने मागील सरकारच्या काळात घोषणा केलेले ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ गेली अनेक वर्षे कागदावरच होते. पहिल्या टप्प्यातील ही 20 वसतिगृहे या शैक्षणिक वर्षातच सुरु करावीत. या वसतिगृहाच्या इमारतीचे निर्माण होईपर्यंत भाड्याच्या इमारतीमध्ये वसतिगृह सुरु करावे असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
The Family Man 3rd Season: ‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
Prakash Mahajan : खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navnath Ban : 'मी डोरेमॉन असेल तर तुम्ही बावळट नोबिता आहात', धंगेकरांना प्रत्युत्तर
TOP 100 Headlines : 12 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 28 OCT 2025 : ABP Majha
Pune Land Row: 'माझी चावी मीच आहे', बिल्डर लॉबीविरोधात आमदार Ravindra Dhangekar आक्रमक
Extradition Row: 'Nilesh Ghaywad ला ताब्यात द्या', पुणे पोलिसांची UK High Commission कडे मागणी
Metro Station Row: 'सरकारला Gandhi-Nehru नावांची ऍलर्जी', Varsha Gaikwad यांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
The Family Man 3rd Season: ‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
Prakash Mahajan : खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Embed widget