एक्स्प्लोर
महेता, बडोलेंसह 'या' सहा मंत्र्यांना घरचा रस्ता, राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले
याचवेळी तीन कॅबीनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
![महेता, बडोलेंसह 'या' सहा मंत्र्यांना घरचा रस्ता, राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले State cabinet expansion - six ministers removed from position of minister महेता, बडोलेंसह 'या' सहा मंत्र्यांना घरचा रस्ता, राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/16163310/maheta-badole.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर याचवेळी तीन कॅबीनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी या सहाही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे.
प्रकाश महेता आणि विष्णु सावरा यांच्या कारभारावर अनेकदा बोटं उठली होती. मेहता यांच्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्री देखील अडचणीत आले होते. तर सवरा यांच्या आदिवासी विभागावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते.
राज्य मंत्रिमंडळात 13 नव्या सदस्यांचा समावेश
दरम्याल, राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, राज्य प्रशासनातील अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
तर राज्यमंत्री म्हणून सर्वश्री योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय (बाळा) भेगडे, डॉ. परिणय फुके आणि अतुल सावे यांनी शपथ घेतली. महातेकर यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर अन्य सदस्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)