एक्स्प्लोर
मंत्रीमंडळ विस्तार : या 13 जणांना मंत्रीपदाची लॉटरी, भाजप 10, शिवसेना दोन आणि आरपीआयचा एक मंत्री
बहुप्रतिक्षित राज्य मंत्रीमंडळाचा आज (रविवारी) विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 10, शिवसेनेचे 2 तर रिपाइंच्या अविनाश महातेकर यांना मंत्रीपदाची शपथ दिली.
मुंबई : बहुप्रतिक्षित राज्य मंत्रीमंडळाचा आज (रविवारी) विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 10, शिवसेनेचे 2 तर रिपाइंच्या अविनाश महातेकर यांना मंत्रीपदाची शपथ दिली. तर दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांना डच्चू देण्यात आला आहे.
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, अनिल बोंडे, संजय कुटे आणि अशोक उईके यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तर भाजपच्या परिणय फुके, अतुल सावे, बाळा भेगडे आणि योगेश सागर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
व्हिडीओ पाहा
राज्याच्या मंत्रिमंडळात आज नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. सकाळी 11 वाजता मुंबईमधील मलबार हिल येथील राजभवन येथे नव्य मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement