एक्स्प्लोर

ST Workers Strike : महामंडळाकडून खाजगी चालकांकरवी शिवनेरी बस सेवा सुरु, संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

ST Workers Strike : एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळानं शिवनेरी बसद्वारे पुणे आणि नाशिकमधून सेवा सुरू केली आहे.

ST Workers Strike : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळानं शिवनेरी बसद्वारे पुणे आणि नाशिकमधून सेवा सुरू केली आहे.  शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस नाशिकवरून पुणे, मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या. संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच शिवनेरी बसेसवरील एसटी महामंडळाचा लोगो काढण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

ST Workers Protest : संप चिघळावा यासाठी विरोधकांचे प्रयत्न, कामगार राजकीय बळी ठरले तर दुर्दैवी : अनिल परब 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार? प्रवाशांचे होणारे हाल कधी थांबणार? सहा दिवस झाले पण या प्रश्नांची उत्तर कुणालाच शोधता आलेली नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सहावा दिवस आहे.  एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. अशातच काल नाशिकमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली.

दरम्यान संपकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर तिकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांवर परिवहन मंत्री अनिल परबांनी गंभीर आरोप केलेत. काही कामगारांना कामावर रुजू व्हायचंय मात्र त्यांची अडवणूक सुरु असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय. 

ST Workers Strike: संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका : अनिल परब 

 नाशिकमध्ये काही बसवर दगडफेक
राज्यभर लाल परीला ब्रेक लागलाय. संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय... शिवाय, काही कामगारांना कामावर यायचं आहे मात्र त्यांना भाजपचे लोक कामावर येऊ देत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. एसटी आंदोलनावरून आझाद मैदानावर परवापासून ठिय्या आंदोलन सुरु आहे..  दरम्यान काल नाशिकमध्ये काही बसवर दगडफेक करण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 12 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सFadnavis vs Danve : शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं!Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!Dada Khindkar: Dhananjay Deshmukh यांच्या साडूकडून युवकाला अमानुष मारहाण,VIDEO सोशल मिडियावर व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
सूर्य आग ओकतोय, आता तरी शाळेची वेळ कमी करा; डोक्यावर दप्तर ठेऊन चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Embed widget