एक्स्प्लोर

ST Workers Protest Live Updates : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पुन्हा तापलं, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीच्या सणात संप पुकारला आहे.

Key Events
ST Workers Strike Live Updates Today maharashtra state road transport corporation employee protest Live ST Workers Protest Live Updates : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पुन्हा तापलं, वाचा प्रत्येक अपडेट
live_blog

Background

ST Workers Strike LIVE Updates Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याने संप सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यात राज्य कार्यकारणीची आज बैठक 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुण्यात राज्य कार्यकारणीची आज बैठक बोलावली आहे.  मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांची तातडीची बैठक आहे. आज 11 वाजता पुण्यातील खराडी येथे बैठक होणार आहे. एका बाजूला राज्य कार्यकारणीची बैठक तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात सर्व डेपो बंद करण्याचे आदेश कृती समितीने दिले आहेत. दोन संघटनांच्या वेगवेगळ्या आदेशामुळे एसटी क्रमचारी संभ्रमावस्तेत आहेत. पुढची दिशा ठरवताना कृतीसमितीला सोबत घ्यायचे की नाही यावरही आजच्या बैठकीत   निर्णय होणार आहे. 

उस्मानाबादेत बससेवा बंद

उस्मानाबादेत पहाटेपासून एकही बस डेपोबाहेर गेली नसल्याने दिवाळी संपवून परतीच्या प्रवासाला जाणार्‍या प्रवाशांची अडचण होत आहे. आगारातील कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे.

नागपूर जिल्ह्यात बससेवा बंद 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे नागपूरच्या गणेश पेठ मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील सर्व आगारात एसटी बसेसचा परिचालन हळूहळू थांबत आहे. एकट्या गणेश पेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून रोज 926 बस फेऱ्या व्हायच्या. सुमारे 40 हजार प्रवासी रोज गणेश पेठ बसस्थानकावरून प्रवास करायचे. मात्र आता एसटीची चाकं थांबल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे काल मध्यरात्रीपर्यंत गणेश पेठ बस आगारातून बस फेऱ्या नियमित सुरू होत्या... मात्र आज सकाळपासून सर्व चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे...

एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार 
एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार झालंय. संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती 3 महिन्यांत न्यायालयाला अहवाल देणार असल्याचं कळतंय.

15:19 PM (IST)  •  07 Nov 2021

जळगावमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचं काम बंद

एस टी महामंडळाचे राज्यशासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळाव्या या मागणीसाठी जळगावमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद करून आंदोलन पुकारल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.  आपल्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आमचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे
15:17 PM (IST)  •  07 Nov 2021

 महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची कार्यकारिणीची बैठक पुण्यात सुरु

एस टी कामगार संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील खराडी या ठिकाणी सुरू आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट होईल,  मात्र एसटी कामगार संघटना कामगारांसोबत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे, संघटना कामगारच्या पाठीशी ठाम असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे 
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget