![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाचा निर्णय
Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरासमोर शुक्रवारी आंदोलन केलं होतं. त्यानंतर अॅड. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
![Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाचा निर्णय ST Strike Sharad Pawar silver oak attack Gunratna Sadavarte got police custody Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/eb3397b0b3a7c2b4fe1c7566ad8aeccb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी रविवारी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आले असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. ही झडती सुमारे सात ते आठ तासांपासून सुरू असल्याचं सांगितलं जातंय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.
संबंधित बातम्या:
- Gunratna Sadavarte : आज कोर्टात काय घडलं? अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद जसाचा तसा
- अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी झडती घेण्यासाठी पोलिसांचं पथक दाखल; पुरावे गोळा करण्याचं काम सुरू
- Sharad Pawar : आंदोलकांनी घटनेआधी शरद पवारांच्या घराची रेकी केली; CCTV मधून खुलासा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)