एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात धावणार एसटी; पण असणार 'या' अटी
लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथीलता देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवनही आता हळहळू पूर्वपदावर येणार आहे. याचाच भाग म्हणून आता लॉकडाऊनच्या काळात गावागावात धावणारी एसटी देखील आता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील जनजीवन आता हळहळू पूर्वपदावर येणार आहे. याचाच भाग म्हणून आता लॉकडाऊनच्या काळात गावागावात धावणारी एसटी देखील आता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वाहक आणि चालकानिशी ही एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यात घेण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रत्येक आगारातून
गावागावांमध्ये धावणाऱ्या एसटी आता धावू लागल्या आहेत. आजपासूनच त्याची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच आगारातून या एसटी आता धावू लागल्या आहेत. पण, यावेळी प्रवासांना काही नियम पाळणे देखील बंधनकारक आहे. एका एसटीमधून केवळ 22 प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. शिवाय, मास्क देखील बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान केवळ 22 प्रवाशांना घेऊन एसटी धावणार असली तरी तिकिट दरामध्ये मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. प्रवाशांनी नियमांचं पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ : नियम धाब्यावर बसवत उत्खनन, रत्नागिरीच्या संगमेश्वरला पुराचा धोका
काय आहे आजची स्थिती?
आजपासून जिल्ह्यातील अनेक भागात एसटी धावत असली तरी आगारांमध्ये प्रवाशांची वर्दळ मात्र कमी आहे. काही ठराविक प्रवाशीच सध्या आगारांमध्ये दिसून येत आहेत. दरम्यान, आजचा पहिला दिवस असल्यानं हळहळू सर्व गाड्या धावू लागतील आणि त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढेल असा आशावाद एसटीकडून व्यक्त केला जात आहे.
काय आहे कोरोनाची स्थिती?
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 390वर पोहोचला आहे. पण, यामध्ये कोरोना मुक्त होण्याची संख्या देखील लक्षणीय आहे. आतापर्यंत 248 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 127 जणांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement