एक्स्प्लोर

ST Bus: 80 पेक्षा जास्त एसटी फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद, एक कोटीचे नुकसान; मराठा आंदोलनाचा भडका!

पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या (ST Bus) फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 160  बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत. 

राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

  •  गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद 
  • बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. 
  • तसेच  बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर  जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद आहे. 
  •  गेल्या चार दिवसांत राज्यभरात 80 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड  तर दोन एसटी बसेसची जाळपोळ 
  • एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
  • विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच  कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द

बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारातून 70 पेक्षा जास्त बस फेऱ्या या मराठवाड्यात होत असतात. मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.

बीडमध्ये 70 बस फोडल्या 

 आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बीडमध्ये बस स्थानकामध्ये पोहोचला.  यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या  होत्या.  जमावाने या सगळ्या  बस फोडल्या आहेत..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget