एक्स्प्लोर
Advertisement
रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट, एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन
फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर शरद जंगम या कर्मचाऱ्यावर विभागीय नियंत्रकांनी निलंबनाची कारवाई केली.
सांगली : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. रावतेंविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर शरद जंगम या कर्मचाऱ्यावर विभागीय नियंत्रकांनी निलंबनाची कारवाई केली.
हे महामंडळ चालवता येत नसेल तर चालते व्हा, अशा आशयाचा मजकूर या कर्मचाऱ्याने फेसबुकवर लिहिला होता. शरद जंगम सांगलीच्या इस्लामपूर डेपोमध्ये वर्कशॉप मेकॅनिक म्हणून काम करतात. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही, लिहिला की फेकला.. असा टोमणाही या पोस्टमध्ये मारला होता.
काय आहे फेसबुक पोस्ट?
मी शरद जंगम
इस्लामपूर आगार
महामंडळाचे अध्यक्ष श्री रावते
यांना खुले आव्हान देतो की एकदा कामगारांच्या समोर या आणि
आपली भूमिका स्पष्ट करा...
हे महामंडळ जर नीट चालवता येत नसेल आणि
कामगारांना त्यांच्या हक्काची वेतनवाढ देता येत नसेल
तर..
चालते व्हा...
कामगार शक्तीचा अंत बघू नका..
आणखी एक गोष्ट आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरणारे
नाही.. लिहिला की फेकला
दरम्यान, मनातील रोष सोशल मीडियावर व्यक्त केल्यामुळे जंगम यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या व्यक्त होण्याचं माध्यम आहे. मात्र महामंडळाच्या हितास बाधक मजकूर सोशल मीडियावर लिहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीतील तरतुदीनुसार चौकशीसाठी जंगम यांना निलंबित करण्यात आलं आहे.
निलंबनाचं पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement