एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल

एसटी संपावरुन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला जात आहे.

मुंबई : एसटी संपाचा आजचा तिसरा दिवस असून, कर्माचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघत नाही आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन अधिकच तीव्र केलं आहे. पण संपावरुन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला जात आहे. "उद्धव ठाकरे शेतकऱ्यांनासाठी जाऊ शकतात, अंगणवाडी सेविकांसाठी जाऊ शकतात. मग एसटीमधील कर्मचारी पण शेतकऱ्यांनाची मुलं आहेत. अंगणवाडी सेविकांची मुलं आहेत, त्यांच्याप्रती असा दुजाभाव का?" असा सवाल इंटकच्या जयप्रकाश छाजेड यांनी उपस्थित केला आहे. तसेच परिवहन मंत्र्यांना एसटी संपावर तोडगा काढता आला नाही, हे त्यांचे अपयश आहे. त्यांच्या मनात कर्मचाऱ्यांच्याविरोधात दुष्ट भावना असल्याची टीकाही छाजेड यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याविरोधात ते कसं बोलतात? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे एसटी संपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. "उद्धव ठाकरे एसटीबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे," असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरुन टीकेची झोड उठवली आहे. “सत्तेत असून सरकारविरोधी भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेकडे परिवहन खातं आहे. मराठी माणसाचा कौवार मिरवणाऱ्या शिवसेनेने ऐन दिवाळीत मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं आहे. त्यांची सद्य घडीला परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे.” दरम्यान, राज्यभरात एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलं. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर धुळ्यात परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केलं, आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित बातम्या "एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा" एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार? ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलणार का? अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?  एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget