आईची हत्या करून काळीज कापून खाल्लं! कोल्हापुरातील नराधमाला फाशीची शिक्षा
आईची हत्या करून काळीज कापून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कोल्हापूर : आईची हत्या करून काळीज कापून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कूचकोरवी असं नराधम मुलाचं नाव आहे. ऑगस्ट 2017 साली कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून सुनील याने घरामध्येच आईची निर्घृण हत्या केली. त्यानंतर सुनीलनं धारदार शस्त्राने आईचे एक एक अवयव धडापासून वेगळे केले.

इतकच नाही तर आईचं काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्न देखील सुनील याने केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील रात्रभर आईच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सहा जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.
आज सत्र न्यायाधीश जाधव यांनी ही दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची घटना असल्याचे नमूद करत करत आरोपी सुनील याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसंच 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय.दरम्यान आरोपी सुनील याला शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहाकडे घेऊन जात असताना त्याचं चित्रीकरण करणार्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना, त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.
Before You Go
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
महत्त्वाच्या बातम्या





















