एक्स्प्लोर

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या भितीने वडिलांच्या अंत्यसंस्कारास मुलाचा नकार!

नातेवाईक पोहचू शकत नसल्याने अनेक ठिकाणी दुसऱ्यांनी अंत्यसंस्कार केल्याच्या घटना या कोरोना काळात राज्यात घडल्या आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात पोटच्या मुलानेच वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.

उस्मानाबाद : जिल्ह्यात 64 वर्षांच्या एका वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. मात्र, त्याची पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताला दम्याचा आजार होता. उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती मरण पावला. त्यानंतर दोन दिवस वडिलांचा मतदेह ताब्यात घ्यायला मुलाने नकार दिला. मुलाने परंडा पोलिसांत आपनं मतदेहावर अत्यंस्कार करू शकत नाही, असे लिहून दिले. आज दोन दिवस वाट पाहून उस्मानाबाद पालिकेतल्या चार कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

कोरोनामुळे पसरलेल्या अवास्तव भीतीमुळे निगेटिव्ह असलेल्या जन्मदात्या पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. त्यामुळे मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. जन्मदात्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे मुलाने लिहून दिल्यामुळे बेवारस अशी नोंद घेत उस्मानाबाद नगरपालिकेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सोमवारी मयत झालेल्या परंडा तालुक्यातील उकडगाव येथील मयतावर बुधवारी दुपारी येथील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

50 पोलीस क्वॉरन्टाईन, आम्हाला सहकार्य करा; पोलिसांच्या आवाहनाला सोलापूरकरांचा प्रतिसाद

नातेवाईक असताना बेवारस अशी नोंद दमा आणि अन्य आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 64 वर्षीच्या ह्या व्यक्तीला पाच दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. दम्याच्या आजारामुळे उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांना सुध्दा करोनाची बाधा आहे असं समजून मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. अन्य नातेवाइकांनीही जबाबदारी घेण्यापासून पळ काढला. चक्क दोन दिवस अंत्यविधीविना मृतदेह रुग्णालयात पडून होता. दोन दिवस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच पुढे न आल्यामुळे पोलीस पंचनामा करून बेवारस अशी नोंद घेण्यात आली.

पोटच्या मुलाची मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता परंडा येथील उकडगव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. तपासणीअंती तिचा अहवाल सकारात्मक असल्याचे समोर आले. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. तिच्या पतीचा अहवाल मात्र नकारात्मक आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, अन्य आजारांमुळे त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना नसलेल्या वृद्धाचा अन्य आजारामुळे सोमवारी मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या अवास्तव भीतीपोटी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक तसेच कुटुंबातील सदस्यांनी चक्क नकार दिला. पोटच्या मुलानेच मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता दाखविल्याने मृतदेह सलग दोन दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. बुधवारी दुपारी कायदेशीर सोपस्कार पार पाडत उस्मानाबाद पालिकेच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपल्या वडिलांचे अंतिमसंस्कार करण्यास आपण असमर्थ असल्याचे लेखी निवेदन मुलाने परंडा पोलीस ठाण्यात दिले असल्याची माहिती आहे. त्यानुसार परंडा पोलिसांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरील माहिती दिली. त्यामहितीच्या आधारे पोलीस पंचनामा करून सर्व कायदेशीर बाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर उस्मानाबाद नगर पालिकेने चार कामगारांच्या मदतीने पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

Population | लॉकडाऊनमुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता, फाऊंडेशन फॉर रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ सर्विसेसचं भाकित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget