एक्स्प्लोर
अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी मुलगा-सूनेकडून महिलेची हत्या

चंद्रपूर : आईच्या जागेवर सरकारी नोकरी मिळावी म्हणून मुलानेच पत्नीच्या मदतीनं आपल्या आईची हत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरीमध्ये ही घटना घडली आहे. हत्येप्रकरणी आरोपी मुलगा-सून आणि दोन सुपारी किलर्सना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बातुनीबी अमीर अली सय्यद या महिलेची हत्या झाली होती. हत्येमागे मृत महिलेचा मुलगा आणि सुनेचाच हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. दोघांनी तब्बल 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं. अवघ्या पंधरा दिवसांनंतर बातुनीबी अली सय्यद सेवानिवृत्त होणार होत्या. त्या चंद्रपुरातील वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड या सरकारी कोळसा कंपनीत शिपाई पदावर कार्यरत होत्या. मात्र आपल्या पतीला अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळावी, म्हणून सुनेने सासूच्या हत्येची सुपारी दिली.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















