एक्स्प्लोर

Solaupur Unlock : येत्या दोन दिवसांत सोलापूरला पुण्याप्रमाणेच शिथिलता : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सोलापूर : पुण्याहून कमी पॉझिटिव्हिटी रेट असताना देखील सोलापूरकरांना निर्बंधामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर निर्बंधामध्ये शिथिलता द्यावी यासाठी पाठपुरावा करीत असून येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन येत्या दोन दिवसांत पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार असल्याचे पालकमंत्री  दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले आहे.  राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यामार्फत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती कळवली आहे.

संतोष पवार यांनी सांगितले की, पालकमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. आजच निर्णय होणे अपेक्षित होता परंतु मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असल्याने प्रस्तावावर सही होऊ शकेली नाही. परंतु  यासाठी पाठपुरावा करीत असून येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार आहे. 

सोलापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात कोरोना नियंत्रणात आहे. व्यापारी व दुकानदार कोरोना नियमांचे पालन करीत आहेत. सायंकाळी 4 नंतर शहरातील दुकाने बंद असतात. सोलापूर शहराचा जुलै महिन्यातील पॉझिटिव्हीटी रेट एक टक्क्यांपेक्षा खाली आहे. ऑक्सिजन बेडची टक्केवारी सहा टक्के आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारपेठ सुरू करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे जून महिन्यात बाजारपेठ सुरू झाली होती. आता मात्र स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली होती. 

पुण्यात आज पासून दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र राज्यशासनातर्फे अद्याप कोणतीही परवानगी न मिळाल्याने सोलापूर शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. सोलापूर शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 1.3 टक्के इतका आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात यावेत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र काल पालिका आयुक्तांनी आदेश जारी करत आधी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील अशा सूचना दिल्या आहेत.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget