Solapur : घात झाला! चालत्या रेल्वेवर दगड भिरकवला, पाच वर्षांची आरोही जागेवरच संपली, कुटुंबाने टाहो फोडला
कुलदैवतेच्या दर्शनानंतर आपल्या पाच वर्षांच्या लेकीला घेऊन रेल्वेतून परत येत असताना टिकेकरवाडी स्टेशनजवळ अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर दगड फेकला.

Solapur: कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परत येत असताना चालत्या रेल्वेत बाहेरील अज्ञाताने दगड मारल्याने 5 वर्षाच्या चिमूकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोही अजित कांगले असे 5 वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. विजयपूर ते रायचूर पॅसेंजरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील टिकेकरवाडी स्टेशनजवळ काही अंतरावर ही गंभीर घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. स्टेशन येताच तातडीने मुलीला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,तोपर्यंत उशीर झाला होता. मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. चालत्या रेल्वेत फेकलेल्या दगडामुळे 5 वर्षांच्या मुलीला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (Solapur News)
नक्की घडले काय?
विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसने कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परतताना एका कुटुंबावर मोठाच बाका प्रसंग ओढावलाय. कुलदैवतेच्या दर्शनानंतर आपल्या पाच वर्षांच्या लेकीला घेऊन रेल्वेतून परत येत असताना टिकेकरवाडी स्टेशनजवळ अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर दगड फेकला. हा दगड प्रचंड जोरात पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यात बसला की तिचा मृत्यू झाला. डोक्याला बसलेला मार एवढा जबर होता की स्टेशन येताच कुटुंबियांनी तिला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात नेले.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं.या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोहीला मृत घोषित करताच नातेवाईकांनी आक्रोश केला. पाच वर्षांच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.हा दगड नेमका कशामुळे आणि कोणी फेकला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुटुंबियांनी दोषी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निष्पाप चिमुकलीचा जीव गेला असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
स्वीमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
भाईंदर पूर्व येथील गोल्डनेस्ट परिसरातील मनपा संचलित स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्वीमिंग पूलमध्ये 11 वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी घडली.प्राथमिक माहितीनुसार, ग्रंथ मुथा हा नेहमीप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गेला होता. काही वेळातच तो पाण्यात गायब झाला. परंतु त्या वेळी पूल परिसरात उपस्थित प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर लक्ष न दिल्याने कुणालाच त्याच्या नसल्याची जाणीव झाली नाही. काही वेळाने तो पाण्यात बेशुद्ध अवस्थेत सापडला. तातडीने त्याला भाईंदरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा:
























