एक्स्प्लोर

सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेला झटका; विरोधी पक्षनेते महेश कोठे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षावर नाराज असलेल्या कोठेंनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळत आहेत. पालिकेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसतोय. कारण पालिकेचे विरोधीपक्षनेतेच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. विरोधीपक्ष नेते महेश कोठे हे विधानसभा निवडणुकांपासून नाराज होते. उद्या मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची माहिती स्वत: महेश कोठे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

महेश कोठे हे सोलापूरातील शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षातर्फे कोठे यांना डावलून मानेंना विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. पक्षावर नाराज असलेल्या कोठेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक देखील लढवली. मात्र त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर देखील पालिकेतील विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी महेश कोठे यांच्यावर कायम होती.

मात्र नाराज असलेल्या कोठेंनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी स्वत: दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला कायम आदर होता. तो पुढे देखील राहिल. पक्ष वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती. विधानसभेच्या जागेवर माझा हक्क होता. मात्र मला संधी न देऊन डावलण्यात आलं. तेव्हापासून मी नाराज होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी भेटण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र मधल्या काही लोकांनी भेट देखील होऊ दिली नाही. मी राष्ट्रवादीत जरी प्रयत्न करत असलो, तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलाताना कोठे यांनी दिली.

पाहा व्हिडीओ : शिवसेनेचे सोलापुरातील नगरसेवक महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

एमआयएमचे नेते देखील काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करतील : महेश कोठे

पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्याला दिल्याने नाराज असलेले एमआयएमचे नेते नगरसेवक तौफीक शेख हे देखील आपल्या नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. या बाबत देखील महेश कोठे यांनी प्रतिक्रिया दिली. "एमआयएम नेत्यांचा प्रवेश हा माझ्या आधी होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश रखडला आहे. येत्या 15 ते 20 दिवसात त्यांचा देखील प्रवेश होण्याची शक्यत आहे." अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांनी दिली.

वडीलांचा निर्णय हा वैयक्तिक, आम्ही शिवसेनेतच राहणार : नगरसेवक प्रथमेश कोठे

महेश कोठे यांच्या परिवारातील काही सदस्य देखील सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक आहे. मुलगा प्रथमेश कोठे, पुतणे देवेंद्र कोठे, बहीण कुमुद अंकाराम, जावई विनायक कोंड्याल हे सोलापूर महानगर पालिकेचे शिवसेनेचे सदस्य आहेत. परिवारातील हे सदस्य देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. "प्रत्येकाला निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य आहे. मी कोणत्याही प्रकारे परिवारातील सदस्यांवर सोबत प्रवेश करण्यासाठी बळजबरी केलेली नाही." अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांनी दिली. तर "वडीलांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही परिवारातील सदस्य शिवसेनेतच आहोत. पुढे देखील पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करु" अशी प्रतिक्रिया महेश कोठे यांचा मुलगा नगरसेवक प्रथमेश कोठे याने दिली.

पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी अमोल शिंदे यांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरु

महेश कोठे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्याने त्यांच्याकडील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट करण्याच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांची विरोधीपक्ष नेते पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांनी अमोल शिंदे यांनी तसा शिफारस पत्र विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केल्याची माहिती नगरसेवक अमोल शिंदे यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतरित्या महानगरपालिकेस पत्र येण्यास साधरण दोन दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महेश कोठे यांच्या प्रवेशावरुन शिवसेना नेत्यांनी विविध भावना व्यक्त केल्या. "महेश कोठे पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र त्यांनी जाण्याचाच निर्णय घेतला असले तर त्यांची अडवणूक आम्ही करु शकत नाही. त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्यामुळे सेनेला थोडासा फटका बसला तरी आम्ही पालिका निवडणुकीत कसर भरुन काढू" अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी दिली. तर "महेश कोठे विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेल्यामुळे नाराज होते. त्यांनी बंडखोरी केली तर पक्षाने त्यांचेकडे असलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी कायम ठेवली होती. विधानसभा निवडणुकीत संपर्क प्रमुखांनी महेश कोठे यांचं तिकीट कापलं होतं. संपर्क प्रमुखांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम आहे." अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख पुरषोत्तम बरडे यांनी दिली.

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना सक्त आदेश, तटकरेंची माहिती, तर रोहित पवारांवरही टीका 
शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना सक्त आदेश, तटकरेंची माहिती, तर रोहित पवारांवरही टीका 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget