आईच्या डोळ्यादेखत मुलगा आणि पुतण्या गेला वाहून, मुलांना शोधण्यासाठी संपूर्ण गाव ओढ्यावर, धक्कादायक घटनेनं सांगोला हादरलं
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगोल्यातील (Sangola) महिम येथून दोन मुले कासारगंगा ओढ्यात वाहून गेली आहेत.
Solapur Sangola news : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगोल्यातील (Sangola) महिम येथून दोन मुले कासारगंगा ओढ्यात वाहून गेली आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून वाहून गेलेल्या मुलांची शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. मुलांच्या शोधासाठी आता प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, घटस्थापनेपूर्वी कपडे धुवायला गेलेली ही दोन मुले पाण्याच्या वेगामुळे वाहून गेली होती. सध्या कासारगंगा ओढ्याला विराट नदीचे स्वरूप आले असून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. श्रीधर किरण ऐवळे आणि सोमनाथ विठ्ठल ऐवळे अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे होती. दरम्यान, शोधमोहिम सुरु झाल्यानंतर काही वेळाने दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने मुलांची शोधमोहिम सुरु केली होती. दरम्यान, नेमकी ही दुर्घटना कशी घडली याबाबतची अद्याप माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुलांच्या शोधासाठी आता प्रशासन घटनास्थळी दाखल
संपूर्ण गाव मुलांना शोधण्यासाठी ओढ्याकाठी पोहोचले असून कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला आहे. आई सोबत नदीवर कपडे धुवायला गेलेला मुलगा व पुतण्या आईच्या डोळ्यादेखत ओढ्यात वाहून गेले आहेत. एक मुलगा पंधरा वर्षाचा असून दुसरा मुलगा तेरा वर्षाचा आह. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मुलांच्या शोधासाठी आता प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंढरपूरवरुन NDRF ची बोट मागविण्यात आली आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस
दरम्यान, गेल्या पाच ते सहा दिवसापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूर्स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर देखील आले आहेत. या काळात अनेक ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. अनेकांची घरे पाण्जयाखाली गेली आहेत. जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुसकान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी देखील संकटात सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या:























