एक्स्प्लोर
सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळला, पण...
मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक सुरु असताना पहिला मानाचा नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळला आणि त्याने पेट घेतला.
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धरामेश्वरांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला.
सध्या सोलापुरात सिद्धरामेश्वरांची यात्रा सुरु आहे. रविवारी रात्री मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक सुरु होती. त्यावेळी एक वाजताच्या सुमारास पहिला मानाचा नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळला आणि त्याने पेट घेतला.
हा प्रकार घडला तेव्हा हजारो भाविक यात्रेत सहभागी होते, त्यामुळे मोठा अनर्थ ओढवू शकला असता. मात्र मानकऱ्यांनी नंदीध्वज वेळीच सावरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
तासाभरात नंदीध्वजाला दुसरी खेळणी लावून पुन्हा मिरवणूक रवाना झाली. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास हा सोहळा संपला.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement