एक्स्प्लोर
ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला!
एमआयएम सदस्य तौफिक शेख, गाजी जहागीरदार, रियाज खरादी यांनी असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याची मागणी केली होती.
सोलापूर : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला. आज झालेल्या सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव बहुमताने फेटाळून लावला.
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आजची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी ओवेसींना मानपत्र देण्याचा सभासद प्रस्ताव मांडला होता. भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी एमआयएमच्या काळ्या इतिहासाचा मुद्दा मांडत मानपत्र देण्याचा विषय फेटाळून लावला.
एमआयएम सदस्य तौफिक शेख, गाजी जहागीरदार, रियाज खरादी यांनी असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याची मागणी केली होती. आजच्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवर हा विषय आला. तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी त्याला विरोध केला. शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी या पक्षाचा इतिहास सभागृहासमोर मांडला. राष्ट्रद्रोहाचं काम केलेल्या पक्षाच्या प्रमुखाला मानपत्र नको, असं सांगत त्यांनी विरोध दर्शवला.
ओवेसी यांनी सोलापूरसाठी कोणतंही उल्लेखनीय काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांना मानपत्र देता येणार नाही, अशी उपसूचना भाजपने मांडली़. ओवेसी हे उच्चशिक्षित आणि बुद्धिमान आहेत. पण एमआयएमच्या स्थापनेचा इतिहास पाहता मानपत्र देण्यास आमचा विरोध आहे, अशी भूमिका भाजपने घेतली.
एमआयएमचे तौफिक शेख यांनी एका पक्षप्रमुखांच्या कार्याची नोंद घेण्याची मागणी केली. संसदेतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानपत्र देण्याचा विचार व्हावा अशी विनंती सभागृहाला केली. अखेरीस बहुमताने ओवेसी यांना मानपत्र देण्याचा ठराव फेटाळण्यात आला़. एमआयएमच्या सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
सभागृहाच्या पटलावर ओवेसींच्या मानपत्राचा विषय येताच गोंधळाला सुरुवात झाली. एमआयएम आणि शिवसेना नगरसेवक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. सत्ताधारी भाजपनेही मानपत्र देण्यास विरोध दर्शवला. बहुमताच्या आधारे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement