Solapur : कुरुनूर धरण परिसरात अनधिकृत मांगूर मासा प्रकल्प; 51 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अक्कलकोट परिसरात मांगूर या माशाचा अनधिकृत प्रकल्प सुरु असून त्यामुळे 51 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.
सोलापूर : अक्कलकोटमध्ये बंदी असलेल्या मांगूर माशाचे मत्स्यपालन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अक्कलकोट येथील कुरनूर धरणाजवळ बेकायदेशीरित्या शेततळे खोदण्यात आले आहेत. त्यामध्ये बंदी असलेल्या मांगूर प्रजातीच्या माशांचे पालन होत असल्याची करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या मत्स्यपालनासाठी कुरनूर धरणाच्या पाण्याचा वापर केला जात आहे.
अवैध मत्स्यपालनातून निर्माण झालेला घाण पाणी परत धरणात सोडला जात असल्याचा आरोप अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी केला. मोरे यांच्या तक्रारीनंतर मत्स्यविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मांगूर हा विषारी मासा असून त्याचे पालन आणि संवर्धन करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र अक्कलकोट येथे मागील चार वर्षांपासून बेकायदेशीररित्या हा प्रकार सुरू असून याविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती मत्स्यविभागाचे सहायक आयुक्त राजकुमार महाडिक यांनी दिली.
कुरनूर धरण परिसरजवळ 19 तलाव खोदण्यात आले होते. तिथे मांगूर माशांचे पालन केले जात होते आणि त्यांच्यासाठी खाद्य म्हणून मांस वापरले जायचे. त्यामुळे या धरणातील पाणी हे अत्यंत दूषित आणि घाण होत आहे. या धरणातील पाणी हे अक्कलकोट शहरासह जवळपासच्या 51 गावांना पुरवलं जातं. त्यामुळे या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे या 51 गावांतील नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि हा प्रकार तात्काळ बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारची पाहणी करून मत्स्यविभागाने सोलापुरातील अकिल काझी, शकील काझी, मैनोद्दीन पटेल यांच्यासह हैदराबाद येथील बाले कोंड्यालू, सईद राजू यांच्या विरोधात अक्कलकोट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'चिमणी'मुळे टीकेचे धनी बनलेले काडादी अखेर अध्यक्षपदावरुन बाजूला, कारखान्याची सूत्रं दिली मुलाच्या हाती
- Water Taxi : मुंबई ते बेलापूरचा प्रवास आता वॉटर टॅक्सीमधून अवघ्या 35 मिनिटात होणार, जाणून घ्या किती आहे तिकीट दर
- Solapur : पोलीस अधीक्षक, न्यायाधीशांच्या नावे फेक अकाऊंट काढून पैशाची मागणी, आरोपी गजाआड