माढ्याच्या बारलोणीत राडा! पोलिसांवर हल्ला करुन आरोपीला सोडवले, जमावाची दगडफेक
आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली आणि आरोपीला सोडवून घेतले. हा प्रकार घडला आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बारलोणीत.

माढा : गुन्ह्यांमधील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली आणि आरोपीला सोडवून घेतले. हा प्रकार घडला आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बारलोणीत. चोरी, दरोडा, बॅग लिफ्टिंगसारख्या अनेक गुन्ह्यात हवा असलेला आरोपी शंकर गुंजाळ आल्याची माहिती मिळताच सोलापूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक बारलोणी या गावात पोहोचले. पोलिसांचं पथक गावात पोहोचताच 25 ते 30 जणांनी दगडफेक करीत आरोपीला सोडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पंढरपुरात चोराची भन्नाट शक्कल! नारळाच्या झाडावरुन माडीवर उतरत करायचा चोरी
बारलोणी येथे काही मंडळी सोने चांदी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांच्या हिट लिस्ट वर होते. यातील शंकर गुंजाळ हा अट्टल आरोपी गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडले होते. मात्र पोलिसांनी शंकरला पकडल्यानंतर काही महिला व काही गावकऱ्यांनी पोलीसांच्या गाडीवर तूफान दगडफेक करत आरोपीला सोडवले. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हे मोठा फौजफाटा घेऊन पुन्हा या सर्व आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी येथे दाखल झाले आहेत.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या






















