महापुरामुळं सोलापूर जिल्ह्याचं 867 कोटी रुपयांचं नुकसान, एक ते दोन दिवसात पैसे मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
नुकत्याच आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसान 867 कोटी रुपयांचे झाले आहे. याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे.
Solapur News : नुकत्याच आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसान 867 कोटी रुपयांचे झाले आहे. याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असून त्यानुसार येत्या एक-दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. या महापुरात जवळपास 6 लाख 4 हजार हेक्टर शेतीवरील पिकांना महापुराचा फटका बसला आहे. तर तब्बल 7 लाख 60 हजार शेतकरी या महापुरामुळे बाधित झाल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील 115 गावांना महापुराचा फटका, 15000 बाधित पूरग्रस्तांना दिवाळीसाठी रेशन किट मिळणार
जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी केलेल्या पंचनाम्याचे अहवाल शासनाकडे अपलोड करणे सुरू आहे. हे काम संपतात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असा विश्वास आशीर्वाद यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील 115 गावांना महापुराचा फटका बसला होता आणि जवळपास 15 हजार नागरिकांच्या घरात महापुराचे पाणी शिरले होते. यासाठी आता जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून या 15000 बाधित पूरग्रस्तांना दिवाळीसाठी रेशन किट देण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठी मोठे ट्रक आणि लहान टेम्पोची व्यवस्था करण्यात आली असून हे 18 प्रकारचे जीवनावश्यक साहित्य असलेले किट पूरग्रस्तांच्या घरी दिवाळीपूर्वी पोच होईल याची खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या 15000 पूरग्रस्तांना दिवाळीसाठी शर्ट पॅन्ट साडी अशी भेट बनवली आहे
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या 15000 पूरग्रस्तांना दिवाळीसाठी शर्ट पॅन्ट साडी अशी भेट बनवली आहे. तीही शासनाच्या किट सोबतच पूरग्रस्तांना दिली जाणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याला बसला असून शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची मदत देत आहे. जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अतिवृष्टी आणि महापूर यामुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. कोणच्या घराचं तर कोणाच्या व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना, व्यवसायिकांना सरकारनं तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. त्यासंदर्भात आज जिल्ह्याधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray on Farmer Loan Waiver: राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर 'आसूड'
























