एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Farmer Loan Waiver: राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर 'आसूड'

Uddhav Thackeray on Farmer Loan Waiver: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला.

Uddhav Thackeray on Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील मोर्चात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. शेतकऱ्यांना भेटलो तेव्हाच मी जाहीर केलं जोपर्यंत हे सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही. गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता, यावेळी आलो तेव्हा कडक ऊन आहे. इतर वेळेला शिवसेना तुमच्यासोबत आहेच पण ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे. हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी शेतकऱ्यांशी बोलूनच केली आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांना अमान्य आहे. सरकारचे पॅकेज ही मोठी थाप असून स्वतःचीच पाठ खाजवून घेत आहेत, थोपटून घेत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागत आहोत तर 50 खोके ज्यांनी घेतले आहे त्यांच्याकडे मागत आहोत. त्यामुळे ते सहजासहजी वठणीवर येणार नाहीत. तुम्हाला चाबूक हातात घ्यावा लागेल आणि यांना बरोबर वठणीवर आणावे लागेल. पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे. काल, परवा देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. त्यांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का? ज्या पंतप्रधानांना आपण जिथे चाललो आहोत तिथली परिस्थिती माहित नाही तर आपण त्यांच्याकडे काय न्याय मागत आहोत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं

कैलास तुम्ही जे म्हणालात राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. पण आता एका क्षेत्र शेतकऱ्याने सांगितले की, साहेब हातात टरबूज दिला. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय की, तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.   

Uddhav Thackeray on Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे

तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मतं हवी आहेत. शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही सरकार आणता. शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही राजकारण करतात. मग शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणतात त्याचे राजकारण नाही. हे कुठलं सरकार आहे? कर्जाचे पुनर्गठन करणार असे सांगितले. आम्हाला हे पुनर्गठण नको आहे. आजचं मरण उद्यावर नको. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे. मुख्यमंत्री बोललेत की, यांना अधिकार काय? परंतु मला अधिकार आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. सरकारला आम्ही इशारा देत आहोत जर तुम्ही कर्जमुक्त केली नाही तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरवून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला. तर कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.  

आणखी वाचा 

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: जैन मुनींकडून जनकल्याण पार्टीची घोषणा, पक्षचिन्ह कबुतर; मनसेची पहिली प्रतिक्रिया, मनीषा कायंदेही कडाडल्या!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: मविआ-मनसे एकत्र, स्थानिक स्वराज्यासाठी Nashik मध्ये पत्रकार परिषद
Mahendra Dalvi On Ajit Pawar: 'कोलाड नाक्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळा पाहिला,महेंद्र दळवींचा अजित पवारांवर आरोप
Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप, भाजप-शिवसेनेत इनकमिंग-आउटगोइंग
Hemant Gawande Land Scam: खडसेंच्या भोसरी प्रकरणातील व्हिसलब्लोअर हेमंत गावंडेंवर जमीन घोटाळ्याचा ठपका
MNS on Voter List: भ्रष्टाचार वाढला, दुबार मतदारांची यादी निवडणुक आयोगाकडे देणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
डॉक्टरच्या खोलीत तब्बल 300 किलो RDX सापडलं; AK-56 आणि काडतुसे जप्त, दोन दिवसांपूर्वीच, काश्मीरमध्ये त्याच्याच लॉकरमध्ये एके-47 सापडली
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला? अनमोल बिश्नोई कॅनडातून अटकेत?
बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला?
Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; BMC च्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
Khed Nagarparishad Election 2025: भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
Suraj Chavan Wedding: अरेंज वैगरे न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत बोहल्यावर चढणार
अरेंज न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीशीच बांधतोय लग्नगाठ
Embed widget