एक्स्प्लोर

भाजपच्या उपमहापौरांवर उपायुक्तांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा, शिवीगाळ केल्याचाही आरोप

भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना खंडणी मागितल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपमहापौरांचा निषेध केला आहे. आजपासून काळ्या फित्या लावून काम करणार असल्याची माहिती आहे.

सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या उपमहापौरांवर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, 'तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन' अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची मागणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास सांगितले असताना ते काम न झाल्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केला आहे.

यासंदर्भात पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली असून उपमहापौर काळे यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री काळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र राजेश काळे हे घरातून फरार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान याप्रकरणी उपमहापौर काळे यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी सधन घरातील असून मला कोणत्याही प्रकारच्या पैशांची गरज नाही. त्यामुळे खंडणीचा आरोप खोटा असल्याची प्रतिक्रिया राजेश काळे यांनी दिली. तसेच उपायुक्त धनराज पांडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्या संदर्भात मी तक्रार दिली म्हणून खोटी तक्रार दिल्याचा दावा देखील काळे यांनी केला आहे.

सोलापूरच्या उपमहापौरांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद

अधिकाऱ्यांकडून उपमहापौरांचा निषेध दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपमहापौरांचा निषेध केला आहे. आजपासून काळ्या फित्या लावून काम करणार असल्याची माहिती आहे. राजेश काळे यांचा सदस्यत्व पद रद्द करावं, अशी मागणी पालिकेचे कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे. काळे यांच्या विरोधात पालिकेतील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यात पालिकेचे अधिकारी देखील सहभागी झाले. पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहायुक्त सुनील माने, नगर अभियंता संदीप कारंजे, नगररचना विभाग प्रमुख लक्ष्मण चलवादी इत्यादी अधिकारी आंदोलनात सहभागी झाले.

भाजपच्या नगरसेवकांनी देखील काळ्या फिती लावून दिला घरचा आहेर

उपायुक्त धनराज पांडेंना केलेल्या शिवीगाळाचा निषेध करत भाजपच्याच नगरसेवकांनी राजेश काळे यांना घरचा आहेर दिला. राजेश काळे यांनी वापरलेली भाषा ही अतिशय निंदनीय असून त्यांच्या कोणत्याही भाषेचं पक्ष समर्थन करत नाही. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला त्यांनी सामोरं जावं. तसेच या बाबात सर्व माहिती वरिष्ठांना कळवू. पक्ष यावर योग्य पद्धतीने कारवाई करेल अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी दिली. तर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटीस, नागेश वल्याळ, प्रभाकर जामगुंडे यांनी काळी फिती लावून उपायुक्तांना पाठिंबा दिला. तर राजेश काळे यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणार असल्याचं भाजपच्या नगरसेवकांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget