एक्स्प्लोर
सोलापूरच्या नवदाम्पत्याची आहेराच्या पैशातून गावकऱ्यांना अनोखी भेट

सोलापूर : सोलापुरातील एका नवदाम्पत्याने लग्नानंतर गावकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. वैराग गावातील तुळशीदास नगरमधल्या सचिन आणि प्रतिक्षा आतकरे यांनी आहेराच्या पैशांसह काही रक्कम टाकून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं आहे. सचिन आतकरे आणि प्रतिक्षा 16 एप्रिलला विवाहबंधनात अडकले. सचिन पुण्यातील आयटी कंपनीत अभियंते आहेत, तर प्रतिक्षा यांचे अभियांत्रिकीचे पदव्युतर शिक्षण सुरु आहे. लग्नात नातेवाईकांकडून जमलेले आहेराचे 35 हजार रुपयात स्वतः कडील एक लाख 25 हजार रुपयांची भर घातली. त्यातून गावातल्या घरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचं काम सुरु केलं. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतकरे दाम्पत्याने पावसाचं पाणी साठवण्याचा केलेला निर्धार कौतुकास्पद ठरत आहे. गावातील 50 घरांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असून रोज दहा घरांतील काम केलं जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























