एक्स्प्लोर
'व्हॅलेंटाईन्स डे'ला प्रेमी युगुलांना विद्यार्थीसेनेची दांडक्याने मारहाण
सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याने मारहाण केल्याची कबुली विद्यार्थी सेनेने दिली आहे.
सोलापूर : व्हॅलेन्टाईन्स डेला सोलापुरात विद्यार्थी सेनेच्या टवाळांची गुंडगिरी पाहायला मिळाली. एकांतात भेटणाऱ्या एका प्रेमी युगुलाला विद्यार्थी सेनेच्या गुंडांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचं पाहायला मिळत आहे. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
सोलापुरातल्या भुईकोट किल्ल्याजवळ एक जोडपं उभं होतं. त्यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनमानी करत लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केली. घाबरलेल्या तरुण-तरुणीने पळ काढला.
या घटनेची जबाबदारी विद्यार्थी सेनेनं स्वीकारली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याने मारहाण केल्याची कबुली विद्यार्थी सेनेने दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी सेनेच्या या टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी कायदा हातात घेण्याचा अधिकार विद्यार्थी सेनेला कोणी दिला, हा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी सेनेच्या मारकुट्या गुंडांवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement