एक्स्प्लोर

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरुन वरात, पोलीस गुन्हा दाखल करणार

लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांनी आज सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी घोड्यावर बसून रॅली काढली.

सोलापूर : लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांनी आज सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी घोड्यावर बसून रॅली काढली. रॅलीदरम्यान ताशांचा गजर, नाचणारी कार्यकर्ते मंडळी आणि घोड्यावर बसलेले हे बशीर अहमद. हे दृश्य पाहून ही एखाद्या लग्नाची वारात असल्याचा लोकांचा समज झाला होता. परंतु ही निवडणुकीची रॅली होती. विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूर मध्य हा मतदारसंघ आधीच चर्चेत आहे. त्यात आता या अनोख्या उमेदवारीमुळे मतदारसंघ अधिक चर्चेत आला आहे. बशीर अहमद यांचा हा राजेशाही थाट फक्त घोड्यावरील मिरवणुकीपुरता मर्यादित नाही. ते म्हणतात की, आमदार झाल्यावर थेट गृहमंत्री होऊन आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा मनसुबा आहे. तसेच फरार दहशतवादी दाऊद इब्राहिमला आठ दिवसांत अटक करुन भारतात आणण्याचा दावाही त्यांनी केला आहे. बशीर अहमद यांनी मोठ्या थाटात मिरवणूक काढली खरी, मात्र ही मिरवणूक कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने प्रचारात प्राण्यांचे प्रदर्शन आणि वापर करण्यास मनाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बशीर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. या मिरवणुकीबाबत बशीर यांच्याकडे विचारणा केल्यास, ते म्हणाले की, मला डोळ्यांचा आणि मधुमेहाचा त्रास आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी चालू शकत नाही. त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पोलिसांनी मला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यामुळे मी ही मिरवणूक काढली. दरम्यान या मिरवणुकीबाबत पोलीस म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकांच्या प्रचारामध्ये प्राण्यांचा वापर करता येऊ शकत नाही. जर अशा प्रकारे कोणी प्राण्यांचा वापर करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयोगातर्फे देण्यात आले आहेत. बशीर अहमद यांनी परवानगी मागितली होती. त्यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे याची विचारणा केली होती. अशाप्रकारे प्राण्यांचा वापर करता येऊ शकत नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिल्याने बशीर अहमद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यभरात अर्ज भरण्याची लगबग - अर्ज किया है | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget