एक्स्प्लोर

Akshar Sammelan 2022 : अक्षरांच्या उत्सवात मराठी कलाकारांची अनोखी मेजवानी; पंढरीत राज्यस्तरीय अक्षर संमेलन

Pandharpur Solapur Akshar Sammelan 2022 : अक्षरांच्या उत्सवात मराठी कलाकारांची अनोखी मेजवानी. पंढरपुरात भरलंय राज्यस्तरीय अक्षर संमेलन.

Pandharpur Solapur Akshar Sammelan 2022 : मराठी माती ही तशी विविध प्रकारच्या कलाकारांची खाणंच आहे आणि यांच्या अनोख्या कलेतून मराठी मातीचा सुगंध नेहमीच दरवळत असतो. असंच एक अनोखं संमेलन पंढरीत (Pandharpur) झालं आणि यातून असं अनेक छुप्या कलाकारांच्या अनोख्या कलेचं सादरीकरण जगासमोर आलं. निमित्त होतं राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचं, यासाठी महाराष्ट्रातील जवळपास 350 पेक्षा जास्त अक्षरप्रेमी, रांगोळीकार आणि चित्रकारांचा मेळा भरला होता. माझी शाळा, माझा फळा या सोशल मीडियातील ग्रुपपासून सुरु झालेल्या या चळवळीत सध्या राज्यभरातील हजारोंच्या संख्येनं अक्षर यात्री सामील झाले आहेत. अक्षरातून माणसाच्या स्वभावाची ओळख होते, असं माननं आहे आणि या कॅलिग्राफीमुळे कलाकाराच्या भावना हटके पद्धतीनं कागदावर उतरतात. त्यामुळेच सध्या कॅलिग्राफी ही कला समाजात लोकप्रिय होताना दिसत आहे. 

या संमेलनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्यप्रदेशमधील कलाकार देखील सामील झाले होते. मंत्रालयातील महसूल आणि वन सहसचिवापासून रायगडाच्या चिमुरड्यांपर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या सुप्त कलांचं दर्शन घडवलं. मंत्रालयातील महसूल आणि वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून  कॅलिग्राफीची आवड जोपासल्याचं सांगितलं. तर रायगडाच्या भावेश तोडणकर या चिमुरड्यानं एकाच वेळी दोन हात आणि तोंडात पेन धरून अफलातून कला सादर केली. पुणे येथील नागराज माळशेट्टी यानं तर शरद पवार यांच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करताना सध्या पोस्टकार्ड वर तब्बल 1 लाख 22 हजार 386 वेळा पवार यांचं नाव लिहिलं आहे. जे वाचण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागला. अहमदनगर येथील ज्ञानेश्वर कवडे यांनी अक्षर गणेशच्या माध्यमातून 'ABP माझा'ची कलाकृती काही सेकंदात तयार केली. मुंबई येथील अनिल गोवळकर यानं आपली नोकरी सांभाळत कॅलिग्राफीचे विकसित केलेल्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिकं सादर केली. सध्या आपल्याला यात अजून काम करताना नवनवीन कॅलिग्राफर बनविण्याचं असल्याची इच्छा गोवळकर यांची आहे.

Akshar Sammelan 2022 : अक्षरांच्या उत्सवात मराठी कलाकारांची अनोखी मेजवानी; पंढरीत राज्यस्तरीय अक्षर संमेलन
 
चूल आणि मुलं सांभाळत कन्नड तालुक्यातील मेघा बोरसे हिनं पोस्टल कलरचा वापर करत केलेलं साधूचं पोट्रेट तिच्या जिवंत कलाकृतीची साक्ष देत होतं. उच्य शिक्षण घेतलेली ही मेघा नावाची गृहिणी चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता केवळ आवडीच्या ओढीनं आपली कला जोपासत आहे. आज मेघा पेन्सिल, पेन, चारकोलसह इतर पद्धतीच्या कलाकुसरीत तरबेज झाली आहे. बुलढाण्याचे गोपाळ वाकोडे यांच्या स्वाक्षरी पद्धत पाहण्यासाठी तर प्रेक्षकांची झुंबड उडत होती. रांगोळीतील अक्षरलेखन ही सध्या लोकप्रिय होत असलेल्या कलेचं गणेश माने यांच्यासह अनेक कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केलं. या संमेलनाचे मुख्य आयोजक अमित भोरकडे यांनी या अक्षर संमेलनात सामील झालेले सर्व अक्षर यात्रींना अक्षराच्या गोडीनं एकत्रित आणल्याचं सांगितले.  मराठी मातीची ओढ या सर्व मायमराठीच्या सेवेकऱ्यांनी आपल्या कलेतून दाखवून तर दिलीच याशिवाय अनेकांना  यातून कॅलिग्राफीची प्रेरणाही दिली, हेच या अक्षर संमेलनाचं यश आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Embed widget