एक्स्प्लोर
नागपूर महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता 'स्मार्टवॉच'ची नजर
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजेच जीपीएस तंत्रावर चालणाऱ्या या घड्याळाच्या माध्यमातून महापालिकेचे अधिकारी कार्यालयीन वेळेत कुठे असतात, काय करतात याची माहिती ठेवणे शक्य होणार आहे.
नागपूर : कार्यालयात अधिकारी उपस्थित नसतात, कार्यालयीन वेळेत अधिकारी खासगी कामात असतात, सरकारी अधिकाऱ्यांसंदर्भात सामान्य नागरिकांच्या अशा तक्रारी किमान नागपुरात तरी इतिहासजमा होऊ शकतात. कारण नागपूर महानगरपालिकेने यावर अनोखी शक्कल लढवली आहे.
कार्यालयीन वेळेत अधिकारी कुठे असतात, काय करतात यावर नजर ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना जीपीएस आधारित स्मार्ट घड्याळ बंधनकारक केली आहे. नुसतं नजर ठेवणंच नव्हे, तर या स्मार्ट घड्याळाच्या माध्यमातून नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, आकस्मिक भेटी, सामूहिक छापे असे अनेक उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
नागपूर महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी, सर्वच विभागांचे विभागप्रमुख यांच्या हातात सध्या जीपीएस आधारित स्मार्ट घड्याळ दिसत आहे. खुद्द आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी सर्व अधिकाऱ्यांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या कार्यालयीन वेळेत घड्याळ घालण्याचे आदेश दिले आहेत.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजेच जीपीएस तंत्रावर चालणाऱ्या या घड्याळाच्या माध्यमातून महापालिकेचे अधिकारी कार्यालयीन वेळेत कुठे असतात, काय करतात याची माहिती ठेवणे शक्य होणार आहे.
सामान्यपणे कार्यालयीन वेळेत महापालिकेचे अधिकारी त्यांच्या जागेवर नसतात. जनतेला, नगरसेवकांना भेटत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर जीपीएस आधारित घड्याळाचा मार्ग स्वीकारला. कोणत्याही अधिकाऱ्याला त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली जात आहे, त्याच्यावर नजर ठेवली जात आहे असे वाटू नये म्हणून महापालिका आयुक्तांनी या प्रयोगाची सुरुवात स्वतःपासून सुरु केली.
अधिकाऱ्यांची लोकेशन माहीत करणे एवढेच मर्यादित हेतू या जीपीएस आधारित घड्याळाचे नाही. तर या स्मार्ट घड्याळाच्या मदतीनेच आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती (हजेरी) नोंदवली जाणार आहे. या घड्याळामध्ये जिओ फेन्सिंग म्हणजेच एखाद्या अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी त्या निर्धारित केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर गेल्यास त्याची अचूक वेळेनुसार नोंद कंट्रोल रुममध्ये होणार आहे.
तसेच. या घड्याळामध्ये महापालिकेने सिमकार्ड टाकल्यामुळे कंट्रोल रुमच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन, सामूहिक छापे आणि इतर वेळी संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधता येणार आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे नगरसेवकही आनंदित आहे. महापालिकेत नगरसेवकांची भूमिका जनता आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये असते. मात्र, कार्यालयात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नगरसेवकांनाही त्रास जाणवायचा. कामे प्रलंबित राहायची. आता या स्मार्ट घड्याळाच्या मदतीने अधिकाऱ्यांना शोधणे, त्यांच्याशी संपर्क ठेवणे सोपे होईल असे नगरसेवकांना वाटते.
गेल्या वर्षी महापालिकेने आठ स्वच्ेछता कमर्चाऱ्यांना अशा जीपीएस आधारित घड्याळी देऊन त्यांच्या माध्यमातून विशिष्ट भागात स्वच्छतेचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले होते. महापालिकेच्या त्या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर पुरुरस्कारही मिळाले होते. त्याच यशाने उत्साहित होत आता नागपूर महापालिकेने आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीपीएस तंत्राने जोडले आहे. भविष्यात या योजनेचे विस्तारीकरण सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत केले जाणार आहे.
बातमी :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement