एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 14 नोव्हेंबर 2021 : रविवार : ABP Majha

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो

1. जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा, २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान, गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाला मोठं यश, सर्च ऑपरेशन सुरु

2. भाजपच्या बंददरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर अमरावती शहरात संचारबंदी लागू, तीन दिवस इंटरनेट सुविधाही बंद राहणार, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी 
महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 'बंद' दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आला असून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

3. आठ दिवसांनंतरही एसटीची चाकं थांबलेलीच, आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि अनिल परबांमध्ये आज पुन्हा चर्चेची फेरी 

4. मुंबई लोकल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली

5. नोकरी करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी खुशखबर, ईएफपीओने नोकरदारांच्या खात्यात 8.50 टक्के इतकी व्याजाची रक्कम केली वर्ग

6. दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे आठवडाभर शाळा बंद,  सुप्रीम कोर्टाचा लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला

7. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, कमांडिग ऑफिसरसह 5 जवान शहीद, पीएलए आणि PMNPF नं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

8. बालदिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, माझावर वैभव मांगलेसह अभिनय कट्टा तर दुपारी १२ वाजता विशेष कार्यक्रम

9. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भिडणार, न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेवॉन कॉनवेची दुखापतीमुळे माघार

सांघिक खेळाडूंच्या जोरावर जेतेपदाचा दावा करणारा न्यूझीलंड आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेत तुफानी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia)  या दोन तुल्यबळ संघामध्ये आज, टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2021) अंतिम सामना होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता दुबईच्या मैदानावर टी-20 चा नवा चॅम्पियन मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही टी20 चा विश्वचषक जिंकलेला नाही. पण यंदा दोन्ही संघांना ती संधी चालून आलीय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण दुबईतल्या मैदानात जिंकणार कोण? हे सामन्याआधीच्या नाणेफेकीवरही तितकंच अवलंबून आहे

10. अभिनेता राजकुमार राव  आणि अभिनेत्री पत्रलेखा यांची 'लगीनघाई', चंदीगडमध्ये आज वाजणार सनई चौघडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget