एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात डँबिस, शिंग आणून पूजा करायचा, आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले; अंनिसचा खळबळजनक दावा

Ashok Kharat Nashik Crime News: अंकशास्राच्या माध्यमातून भविष्य सांगणारा कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात दाखल बलात्कार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असतानाच अंनिसने खळबळजनक दावा केलाय.

Ashok Kharat Nashik Crime News: अंकशास्राच्या माध्यमातून भविष्य सांगणारा कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात दाखल बलात्कार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाचा तपास करत असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Anis) सदस्यांनी आज एसआयटी प्रमुखांची भेट घेतली. यावेळी भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर करवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे. दरम्यान, यानंतर माध्यमांशी बोलताना अंनिसच्या सदस्यांनी खळबळजनक दावा केलाय. 

Ashok Kharat Nashik Crime News: आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले

अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की, कॅप्टन खरात हा भोंदू बाबा शिंग आणून पूजा करत होता. काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या भोंदू बाबाच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी आम्ही आवाज उठवला. तेव्हा आमच्यावर दबाव आणला गेला. मंत्र्यांचे ओएसडी आम्हाला फोन करत होते. आता हे प्रकरण जुने झाले त्यामुळे त्याला फाटा द्यायचा नाही. मात्र, त्याआधीही आम्हाला अशोक खरातच्या माणसाकडून धमक्या आल्या. आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले होते. त्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आम्ही काही गोपनीय माहिती आणि नंबर तेजस्विनी सातपुते यांना दिले आहेत. तपासात त्यांना मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातकडून धमकी

अंनिसचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे म्हणाले की,  2008 मध्ये आम्हाला या बाबतीत माहिती मिळाली होती. त्यावेळी आम्ही कॅप्टनची भेट घेऊन त्याला सांगितले की, तू भोंदूगिरी करतो. तू डँबिस आहेस. त्यावेळी तो बोलला मी निवृत्त कॅप्टन आहे. माझ्याकडे पिस्तुल आहे. त्याने धमकी दिली होती. त्याला एक संधी द्यावी म्हणून तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली. 

Ashok Kharat Case: नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Who Is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात? 

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

आणखी वाचा 

Ashok Kharat: अशोक खरातकडे मागितली 5 कोटींची खंडणी, नकार देताच ऑफिसबॉयने पीडित महिलांना धमकावले, पण 'तो' व्हिडीओ ठरला टर्निंग पॉइंट; नाशिकमधील 'वासनाकांड'ची धक्कादायक माहिती

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget