एक्स्प्लोर

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case: नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात (Ashok Kharat) या ज्योतिषाला अटक केली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case)

अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे- (Praful Patel On Ashok Kharat Case)

भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत. त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कार्यवाही करणार आणि ते येणाऱ्या काळात दिसेल, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली. 

रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारताच सुनील तटकरे संतापले- (Sunil Tatkare On Rupali Chakankar)

महाडमधील एका कार्यक्रमाला सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी सुनील तटकरेंना अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला. यावर सुनील तटकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने आधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी बोलेन, असं सांगत सुनील तटकरे निघून गेले. (Sunil Tatkare On Ashok Kharat Case)

रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबत अनेक फोटो- (Rupali Chakankar-Ashok Kharat )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर (Ashok Kharat And Rupali Chakankar) यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रुपाली चाकणकरांविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे, सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

संबंधित बातमी:

Sushma Andhare On Rupali Chakankar Ashok Kharat Case: सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांचे भयंकर फोटो दाखवले, स्वत:ची अनामिका कापली, अटक करुन नार्को टेस्टची मागणी!

Ashok Kharat Viral Video Nashik Crime News: बाजूला एक खुर्ची, पांढरा कपडा...अशोक खरातचा दुसरा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर, महिलेला नको नको ते करायला लावलं!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा
Nashik Crime News: नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget