एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

SMART_BULLETIN_1510
स्मार्ट बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये पार पडणार आहे. आपापल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
२. पंकजा मुंडेंच्या मनातलं वादळ आज भगवान भक्तीगडावर घोंगावणार, दसरा मेळाव्यानिमित्तच्या भाषणाची उत्सुकता शिगेला
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे.
३. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, सरसंघचालकांचं भाषण तर कोल्हापुरातील दसरा चौकात शाही मेळावा
४. दसऱ्याच्या मुहुर्ताकडून बाजारपेठेला मोठी अपेक्षा, लॉकडाऊनमुळं आलेली मरगळ दूर करुन ज्वेलर्स, ऑटोमोबाईल डिलर्स, बिल्डर्स ग्राहकांच्या प्रतीक्षेत
५. पुण्यात 8 नोव्हेंबरपासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार, पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे 20 रुपये असणार
६. करमुसे मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन, कोरोनाकाळात दिेवे लावण्याच्या आवाहनानंतर झालेल्या वैचारिक मतभेदावरुन मारहाण केल्याचा आरोप
७. जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागातील लेखी परीक्षेच्या तारखांचा घोळ, लेखी परीक्षेचा खेळखंडोबा होण्याची भिती
८. राज्यात काल 2,384 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण
९. नाशिकमध्ये बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या गरबा कार्यक्रमावर पोलिसांची कारवाई, काही जणांविरुद्ध गुन्हे
१०. आज आयपीएलचा अंतिम सामना, चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडरचा महामुकाबला
आणखी वाचा























