एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोंदियात आश्रमशाळेतील 80 विद्यार्थ्यांना त्वचारोग, शाळेकडून पूजापाठ
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील किरशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या आश्रमशाळेतील 80 विद्यार्थ्यांना तवा हा त्वचारोग झाला आहे. हा त्वचारोग संसर्गजन्य असल्यानं शाळा प्रशासनानं या मुलांवर उपचार न करता घरी पाठवलं आहे. इतकंच नाही तर शाळेच्या संचालकांनी मांत्रिकाला बोलावून पूजापाठही केले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यामध्ये किरशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ही आश्रमशाळा आहे. या शाळेतील 80 विद्यार्थ्यांना तवा या संसर्गजन्य त्वचारोगाची लागण झाली आहे. संसर्गजन्य त्वचारोग असल्याचं कारण देत शाळा प्रशासनानं उपचाराविनाच या सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आहे. घरी पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही याची लागण झाली आहे. इतर मुलांनाही या रोगाची लागण होऊ नये यासाठी शाळेतील 285 विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आलं.
उपचाराविनाच मुलांना घरी पाठवल्यानं आदिवासींच्या नावावर पैसे लाटणाऱ्या शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत किती उदासीन आहेत, हे पुन्हा उघड झालं आहे. सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे शाळेच्या संचालकांनी मांत्रिकाकडून पूजापाठही करुन घेतले आहेत. यासंदर्भात शाळा प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय आहे तवा त्वचारोग:
तवा त्वचारोगामध्ये चेहऱ्यावर आणि अंगावर मोठे फोड येतात.
या रोगाची लागण झाल्यास चामडीही जाते.
हा रोग संसर्गजन्य आहे.
याची लागण इतरांच्या संपर्कात आल्यास होते आणि लागण झालेल्यांमध्ये सारखीच लक्षणं दिसून येतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement