एक्स्प्लोर
भंडाऱ्यात काळी पिवळी गाडी नदीत पडली, पाच मुलींसह सहा जणांचा मृत्यू
भंडाऱ्यात काळी पिवळी गाडी नदीत पडली, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने अपघात झाल्य़ाचा प्राथमिकअंदाज
भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावालगत असलेल्या पुलावर काळी पिवळी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. काळी पिवळी गाडी अनियंत्रित होऊन 80 फूट खाली नदीत पडल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत पाच मुली व एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात सहा प्रवासी गंभीर आहेत
साकोली तालुक्यातील धर्मापुरी या गावालगत असलेल्या पुलावर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अनियंत्रित होऊन काळी पिवळी गाडीचा तोल सुटला आणि ती पुलावरुन 80 फूट खाली चुलबंद नदी पात्रात पडली. नदीत पाणी कमी असले तरीही एवढ्या उंचावरुन पडल्यामुळे गाडीत सवार असलेल्या पाच मुली आणि एक महिला जागीच ठार झाल्या, तर उर्वरित सहा प्रवासी आणि चालक गभींर जखमी झाले आहेत. जखमींना साकोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .
सदर काळीपिवळी साकोली वरुन लाखांदूरला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या काळीपिवळीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी यात भरण्यात आले होते. त्यामुळे गाडी पुलावर अनियंत्रित होऊन खाली पडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement